Avadhoot Gupte: संतोषच्या मदतीला अवधूतची धाव; ट्रोलिंग करणाऱ्यांना सुणावले खडे बोल, म्हणाला, 'हसण्याआधी जरा संतोषच्या...'

Avadhoot Gupte Post For santosh Juvekar: संतोषवर करण्यात येणाऱ्या मिम्स आणि ट्रोलिंग विरोधात त्याचा मित्र आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्तेने एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
Avadhoot Gupte Post For santosh Juvekar
Avadhoot Gupte Post For santosh JuvekarSaam Tv
Published On

Avadhoot Gupte Post For santosh Juvekar: 'छावा' चित्रपटात काम करणारा अभिनेता संतोष जुवेकरला सोशल मीडियावर त्याच्या मुलाखतीतील अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही या वक्तव्यामुळे मोठ्याप्रमाणात ट्रॉल केल जात आहे. त्याच्यावर अनेक मिम्स देखील तयार करण्यात आल्या आहेत. पण आता या मिम्स आणि ट्रोलिंग विरोधात त्याचा मित्र आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्तेने एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

ट्रोलिंग विरोधात अवधूतने संतोषसोबतचा एक पोट पोस्ट करत लिहिले, मित्रांनो! सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!! आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं.. "अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही" हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे.

Avadhoot Gupte Post For santosh Juvekar
Nikki Tamboli : बिग बॉस फेम निक्की तांबोळीने रागात सोडला 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शो? म्हणाली, 'गौरव खन्नाने आधी माफी...'

‘झेंडा‘ च्या वेळेस ‘संत्या‘ च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणा दरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘ च्या वेळेस देखील तसंच. ‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांना केवळ ऑब्जर्व करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता. हे माझ्या सोबतच्या चित्रपटांचे झाले. परंतु, इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना, भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे. आता हीच जर त्याची ‘मेथड‘ असेल तर ती आपण सर्वांनी एक्सेप्ट करायलाच हवी.. कारण ‘रिझल्ट‘ आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे!

Avadhoot Gupte Post For santosh Juvekar
Majhi Prarthana: प्रेम आणि प्रेमातील विश्वासघाताची गोष्ट; अंगावर काटा आणणारा 'माझी प्रारतना' चित्रपटाचा टिझर रिलीझ

अवधूत पुढे म्हणाला, अभिनयाच्या याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे! त्याचं घर कधीही जाऊन बघा.. एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं! त्यातच, तो जवळ रहाणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांची, अधिक पुतणीची काळजी देखील घेतो. कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेली दुर्दैवी काटकसर त्याच्याही नशिबी आहे. परंतु, आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करून ठेवल्याची तक्रार कधीही ऐकलेली नाही. अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडे जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली. पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते, त्याच्या जवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे.. असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर.. त्याचे वेड्यासारखे नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे?

ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतल्या अनेक कलावंतांची आहे. वर्ष भर मेहनत करून एका शुक्रवारी चित्रपट येतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की "बाकी.. नवीन काय करतोयस?" त्यावेळेसचे त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीच कळणार नाही. कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार?

त्यातून, ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरीच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका. कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या. एवढंच! आपला, अवधूत गुप्ते असे म्हणत अवधूतने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मुद्दे उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com