Happy Birthday Shahrukh: शाहरुखच्या वाढदिसानिमित्त 'हे' खास चित्रपट पाहा

शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याच्या सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये 50 ते 60 चित्रपटांचाच समावेश आहे.
Shahrukh Khan
Shahrukh KhanSaam Tv
Published On

Shahrukh Khan Best Movies: बॉलिवूडचा किंग खान, सुपरस्टार शाहरुख खान यावर्षी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने यशराज फिल्म्स शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' शाहरुखच्या चाहत्यांना सिनेमागृहात दाखवणार आहे. या निमित्ताने खास चाहत्यांसाठी शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत ते चित्रपट सर्वांनाच ते चित्रपट आवडतात.

Shahrukh Khan
Celebrity Halloween Party: शक्तिमान सिद्धांत चतुर्वेदीची झाली फजिती, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

शाहरुख खानचे सर्वोत्कृष्ट चित्रपट

शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याच्या सरासरी, हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये 50 ते 60 चित्रपटांचाच समावेश आहे. त्यापैकी काही सर्वोत्तम चित्रपटांचे नावं खास चाहत्यांसाठी

Shahrukh Khan
Janhvi Kapoor: जान्हवीच्या स्वप्नांनी उडवली झोप, शूटिंग दरम्यानचा सिरीयस किस्सा केला शेअर
SRK Movie
SRK MovieSaam Tv

डर (Darr)

यश चोप्रा दिग्दर्शित डर हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता. डर या चित्रपटात शाहरुखने निगेटिव्ह रोल केला होता, पण तो धुमाकूळ घालणार होता. या चित्रपटात जुही चावला आणि सनी देओलही मुख्य भूमिकेत होते.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (Dilwale Dulhaniya Le Jayenge)

या चित्रपटातून आदित्य चोप्राने दिग्दर्शनात पदार्पण केले. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो कायम स्वरूपी ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले होते आणि आजही या चित्रपटातील गाण्यांना चाहते पसंती दर्शवत आहे.

SRK Movie
SRK Movie Saam Tv

दिल तो पागल है (Dil To Pagal Hai)

यश चोप्रा दिग्दर्शित 'दिल तो पागल है' हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यातील प्रेम त्रिकोणाची कथा होती.

कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai)

करण जोहरने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात (1998) मध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यात शाहरुखच्या कामाचे खूप कौतुक झाले. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांची त्रिकोणी लव्हस्टोरी लोकांना खूप आवडली असून गाण्यांना चार चांद लावले.

SRK Movie
SRK MovieSaam Tv

देवदास (Devdas)

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शाहरुखच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्या चित्रपटातील गाणे ही हिट झाले.

कल हो ना हो (Kal Ho Na Ho)

करण जोहरचा कल हो ना हो (2003) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यात शाहरुखच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटात शाहरुखशिवाय प्रीती झिंटा आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते.

Shahrukh Khan
Kushal Badrike: कुशलने सोशल मीडियावर शेअर केला खोडसाळपणा, 'पोस्ट पाहून चाहता म्हणतो....'

वीर झारा (Veer Zaara)

यश चोप्रा दिग्दर्शित वीर झारा (2004) हा सिनेमा सगळ्यांना अजूनही आवडतो. हा चित्रपट प्रेम करणाऱ्यांच्या हृदयाच्या जवळ आहे, विशेषत: जे भेटत नाहीत. शाहरुख खान आणि प्रिती झिंटाची लव्हस्टोरी, राणी मुखर्जीची अधुरी प्रेमकहाणी या दोघांना चांगलीच भावली होती. चित्रपटातील शाहरुखचा अभिनय पाहून लोकही भावूक झाले.

Shahrukh Khan
Sai Tamhankar: मराठमोळी सई ताम्हणकर पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार
SRK Movie
SRK Movie Saam Tv

माय नेम इज खान (My Name Is Khan)

2010 मध्ये करण जोहरचा चित्रपट माय नेम इज खान हा रोमँटिक चित्रपट होता पण त्याची संकल्पना खूपच वेगळी होती. शाहरुख खानने एका मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. ज्याला फक्त मानवतेची भाषा कळते आणि सर्वांनी चित्रपटात शाहरुखचे कौतुक केले. या चित्रपटात शाहरुखसोबत काजोलही मुख्य भूमिकेत होती.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com