

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी
आता बातमी आहे संजय दत्तच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भातली. संजय दत्तने चौथं लग्न केल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच संजय दत्तने 65 व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय का? या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.संजय दत्तने खरंच पुन्हा लग्न केलं? 65 व्या वर्षी संजय दत्त चौथ्यांदा लग्नबंधनात अडकलाय का?
भगवं वस्त्र परिधान करून संजय दत्त पत्नीसोबत अग्निसमोर सात फेरे घेताना दितोय...तर त्याची पत्नी सफेद रंगाच्या सलवारमध्ये दिसते.हे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ पाहा...यात संजय दत्तने पत्नीसोबत 7 फेरे घेतल्याचं दिसतंय...पण, खरंच संजय दत्तने चौथ्यांदा लग्न केलंय का...? सोशल मीडियावर प्रचंड वेगाने हे मेसेज व्हायरल होतायत...तसंच पुरावा म्हणून फोटोही व्हायरल केलेयत.
हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल संजय दत्तने लग्नच केलं. मात्र, या व्हिडिओत दिसतंय ते खरंच आहे का? हे पाहणं गरजेचं आहे.
संजय दत्तची पहिली पत्नी ही रिचा शर्मा होती. 1996 साली रिचा शर्माचं ब्रेन ट्यूमरने निधन झालं. त्यानंतर संजय दत्तने 1998 साली रिहा पिल्लईशी लग्न केलं. मात्र, ते जास्त काळ टिकलं नाही. 2002 साली दोघं वेगळे झाले...त्यानंतर 2008 साली संजय दत्त मान्यता दत्तसोबत तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला मात्र, आता त्याने चौथं लग्न केलंय का?
हा प्रश्न संजय दत्तचे फॅन्सही विचारताय. याबाबत संजय दत्तने कुणाला माहितीही दिलेली नाही. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली.याबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही या व्हिडिओचा आधार घेतला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
संजय दत्तने पुन्हा लग्न केलेलं नाही
संजय दत्त पत्नी मान्यतासोबत आनंदी आयुष्य जगतोय
अग्निसमोर सात फेरे घेत असल्याचा व्हिडिओ पूजेचा
संजय दत्तने घराच्या बाल्कनीत होमहवन केला
होमहवनाचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल
संजय दत्तने घरी होमहवन केला होता.त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे. मात्र, सोशल मीडियावर फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करून संजय दत्तने चौथं लग्न केल्याचा दावा करण्यात आला.आमच्या पडताळणीत संजय दत्तने चौथं लग्न केल्याचा दावा असत्य ठरलाय.संजय दत्त हा मान्यता दत्त आणि दोन मुलांसह आनंदी आय़ुष्य जगतोय...मात्र, काहींना या व्हिडिओचा गैरवापर केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.