Rajesh Khanna: ७०च्या दशकातील सुपरहिट अभिनेता राजेश खन्नाचा असा होता जीवनप्रवास...

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसर येथे झाला.
Rajesh Khanna
Rajesh Khanna Saam Tv
Published On

Rajesh Khanna: बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना यांची हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख होती. राजेश यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये एकाचवेळी तब्बल १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे पहिले सुपरस्टार होते.

वृत्तानुसार, राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ दरम्यान सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

Rajesh Khanna
Rajesh Khanna Birthday: अभिनयापेक्षा राजेश खन्नांना लाईफ स्टाईल होती महत्त्वाची, पहिल्याच चित्रपटाने शिकवली अद्दल

राजेश खन्ना यांना त्यांच्या काळात बरीच प्रसिद्धी मिळाली होती, अनेकदा त्यांना चाहत्यांसोबतचे असे काही प्रसंग आले की त्याची कल्पना करणेच कठीण आहे. चेतन आनंदच्या 'आखरी खत' (1966) मध्ये पदार्पण करणारे राजेश खन्ना हे बॉक्स ऑफिसवर सर्वात विश्वासार्ह अभिनेत्यांपैकी एक मानले जायचे. 40 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'आखरी खत' हा भारतातील परदेशी भाषेतील 'सर्वोत्कृष्ट चित्रपट'चा मानकरी ठरला.

Rajesh Khanna
Nitin Manmohan: बॉलिवूडवर पुन्हा शोककळा! प्रसिद्ध निर्मात्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

सोबत काकांनी म्हणजेच राजेश यांनी 'राज' (1967), 'औरत' (1967), 'बहारों के सपने' (1967), 'इत्तेफाक' (1969) आणि 'डोली' (1970) मध्ये काम केले. जर आपण राजेश खन्ना यांच्या प्रसिद्धी बद्दल चर्चा केली तर काका सर्वाधिक प्रकाशझोतात आराधना (1969) चित्रपटापासून आले. त्यांनी सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले होते. 'आराधना'ला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला होता.

Rajesh Khanna
Dharmaveer 2: 'धर्मवीर' पुन्हा येतोय; निर्मात्यांनी केली घोषणा...

राज खोसला यांच्या 'दो रास्ते' (1969) या चित्रपटानेही राजेश यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर राजेश खन्ना यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागून एक हिट चित्रपट दिले. मनमोहन देसाईंच्या 'सच्चा झूठा' (1970) मध्ये राजेश खन्ना यांनी गावकऱ्याची भूमिका केली होती. मुमताजने त्याच्या प्रेयसीची भूमिका केली असताना, अभिनेत्री नाझने 'मेरी प्यारी बहनिया बनेगा दुल्हनिया' या गाण्याने प्रसिद्धी मिळवली, राजेशने तिच्यासाठी चित्रपटात हे गाणे गायले होते.

Rajesh Khanna
Vivek Agnihotri: 'पठान'च्या वादात विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया, 'चेतावनी- हा व्हिडीओ...' म्हणत केली टीका...

राजेश खन्ना आजही मुकुल दत्तच्या आन मिलो सजना (1970) मधील आशा पारेख सोबतच्या 'अच्छा तो हम चलते हैं' मधील अभिनयासाठी स्मरणात आहेत. याशिवाय काकांचे 'आनंद', 'अंदाज', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची', 'जोरू का गुलाम'हे चित्रपट आजही प्रेक्षकांना फार आवडतात. राजेश खन्ना यांचे 18 जुलै 2012 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. मात्र, तरीही ते नेहमी आपल्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या स्मरणार्थ राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com