Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेत्याला विमानतळावर अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Bollywood Actor Arrested : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे, यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Bollywood Actor Arrested
Bollywood Actorsaam tv
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेत्याला विमानतळावर अटक

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

बॉलिवूड इंडस्ट्री चांगलीच हादरली

साम टिव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमली पदार्थांच्या प्रकरणात फरार असलेल्या मॉडेल आणि अभिनेता रोहुल्लाह मेहदी (Rohullah Mehdi) याला कशिमीरा पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर विमानतळावर उतरताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संबंधित ड्रग्ज प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कशिमीरा पोलिसांना मेहदी मुंबईत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानातून तो येणार असल्याचे समजताच मुंबई विमानतळावर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. रोहुल्लाह मेहदी हा मॉडेल आणि अभिनेता असून सोशल मीडियावर त्याचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अमली पदार्थांच्या या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याचे कथितरित्या ड्रग्ज नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे बॉलिवूड इंडस्ट्री चांगलीच हादरली आहे.

Bollywood Actor Arrested
Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

मेहदीच्या चौकशीतून ड्रग्जचा पुरवठा करणारे व्यक्ती, या नेटवर्कशी संबंधित इतर आरोपी तसेच अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्याच्या अटकेकडे या प्रकरणातील महत्त्वाची कारवाई म्हणून पाहिले जात आहे. ही कारवाई डीसीपी झोन-1 राहुल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलिसांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास काशिमीरा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com