Dharmendra Passes Away : शोलेचा विरू काळाच्या पडद्याआड, सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन, बॉलिवूड शोकसागरात

Dharmendra Passes Away at 89 : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. तब्बल ६ दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
Dharmendra Passes Away
Bollywood icon Dharmendra passes away at 89, leaving the film industry and millions of fans in grief.Saam TV marathi News
Published On
Summary
  • बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.

  • गेल्या काही दिवसांपासून श्वसनासंबंधी त्रासामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  • तब्बल ६ दशकं हिंदी सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली.

  • २५ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे.

Bollywood icon Dharmendra passes away at 89 : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आयएएनएसने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईमधील राहत्या घरी धर्मेंद्र यांचे निधन जाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांनी अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तब्बल ६ दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार अंत्यसंस्कारासाठी पोहचले आहेत.

मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपूर्वी उपचार सुरू होते. काही दिवसांपासून श्वसनासंबंधी त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी, तसेच सहा मुलं — अभिनेता सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, अहाना देओल आणि मुली अजीता व विजेता असा परिवार आहे.

Dharmendra Passes Away
पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

६ दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी मागे अपूर्व असे कार्य सोडले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण युग संपल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे. २५ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे.

Dharmendra Passes Away
Raj Thackeray : परप्रांतीय रिक्षाचालकाची राज ठाकरेंना धमकी, अपशब्द वापरले, ठाण्यातील घटनेने मनसे आक्रमक

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधल्या कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा इथल्या आर्य हायस्कूलमध्ये झालं. धर्मेंद्रंचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं होतं. त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण सिनेमाची,अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला अन् त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं.

१९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या ‘फूल और पत्थर’, ‘यादों की बारात’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘नौकर बिवी का’, ‘बेताब’, ‘घायल’ यांसारख्या अनेक चित्रपटांनी हिंदी सिनेमाला नवे आयाम दिले. २०१२ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Dharmendra Passes Away
Cyclone Alert :  चक्रीवादळाचा इशारा, हिवाळ्यात पाऊस धुमाकूळ घालणार, या राज्यांना अलर्ट

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील खेडेगावात धर्मेंद्र केवाल कृष्ण देओल या नावाने जन्मलेल्या या अभिनेत्याने १९ वर्षांचे असताना प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला. नंतर चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांची ओळख हेमा मालिनी यांच्याशी झाली आणि दोघांनी विवाह केला. वयाच्या उत्तरार्धातही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय होते. नैसर्गिक जीवनशैली, शेती, आरोग्य आणि साध्या जीवनातील आनंदाबद्दल ते चाहत्यांशी शेअर करत असत. ट्रॅक्टर चालवत किंवा शेतात काम करतानाचे त्यांचे व्हिडिओ लोकप्रिय ठरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com