Nyasa Devgan: न्यासा पुन्हा एकदा ट्रोल, मिस्ट्री बॉयसोबत पाहून नेटकरी भडकले...

अजय देवगणची लेक न्यासा देवगण सध्या आपल्या बोल्ड लूकमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
Nyasa Devgan With Mistry Boy
Nyasa Devgan With Mistry BoySaam Tv
Published On

Nyasa Devgan With Mistry Boy: अजय देवगणची लेक न्यासा देवगण सध्या आपल्या बोल्ड लूकमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. कधी ख्रिसमस पार्टीत तर कधी न्यू इयर पार्टीमध्ये तिच्या ग्लॅमरस स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अनेकदा तिच्यासोबत मिस्ट्री बॉयला पाहून त्यांच्या अफेयर्सचाही चर्चा रंगल्या होत्या. त्याने आता पर्यंत एकाच अभिनेत्रीला डेट केले नसून अनेक स्टार किड्सला डेट केले होते.

Nyasa Devgan With Mistry Boy
K Viswanath: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हा मिस्ट्री दुसरा तिसरा कोणी नसून एका बिझनेसमनचा मुलगा आहे. त्याचं नाव ओरहान अवत्रामणी उर्फ ओरी. स्टार किड्सचे अनेकदा ओरी सोबतचे बोल्ड अंदाजातील कोझी फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता. सध्या ओरीचे बरेच फोटो अजयची लेक न्यासासोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. जेव्हा न्यासा फॅमिलीसोबत असते, त्यावेळी ती अनेकदा साध्या कपड्यांमध्ये किंवा अगदी व्यवस्थित दिसते. पण सध्या ओरीसोबत व्हायरल होत असलेले बोल्ड अंदाजातील फोटो पाहून नेटकरी तिच्यावर कमालीचे भडकले.

Nyasa Devgan With Mistry Boy
TDM: दमदार शरीरयष्टी अन् हातात टॉवेल, 'टीडीएम'च्या पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

आतापर्यंत चाहत्यांनी न्यासा देवगणला ओरीसोबत अनेक पार्ट्यांमध्ये पाहिले आहे. तिचे सोशल मीडियावरही पार्टीतले काही फोटो आहेत, ज्यामध्ये ती ओरीसोबत ग्लॅमरस लूकमध्ये हटके पोज देताना दिसत आहे. आता अचानक तिचा बदललेला लूक पाहून सर्वांचीच झोप उडाली आहे. नुकतेच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत न्यासा वडील अजयसोबत एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यात ती खूपच साधी दिसत आहे.

Nyasa Devgan With Mistry Boy
Aishwarya Bachchan Viral Video: बोलके डोळे अन् ग्लॅमरस अंदाज, मिस वर्ल्डचा 'तो' लूक चाहत्यांना आजही करतो घायाळ ! पाहा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये अजय आणि न्यासा साध्या सिंपल लूकमध्ये दिसत असून कोणत्या तरी कारणावरुन आपापसात हसत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी न्यासाला म्हणतात, आई- वडिलांसोबत साधी सिंपल राहते आणि ओरीसोबत बेशरम रंग उधळते.

तर आणखी एक नेटकरी म्हणतो, 'मम्मी पप्पासोबत वेगळी का दिसते आणि मित्रांसोबत खूप सुंदर दिसते.' तर दुसरा नेटकरी म्हणतो, 'कपड्यांची ओढ वडिलांसोबत राहते.'

न्यासा आणि ओरीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांचे एकत्र फोटो जास्त व्हायरल होत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com