बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) अखेर विवाहबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज या कपलचे लग्न झाले. शीख पद्धतीने या कपलचा विवाहसोहळा (Rakul Preet-Jackky Bhagnani Wedding) पार पडला. संध्याकाळी हे कपल हिंदू पद्धतीने देखील लग्न करणार आहेत. रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पण अद्याप लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही शेजारी होते. पण त्यांना कधीच कळले नाही. त्यांच्यामध्ये मैत्री नव्हती, पण लॉकडाऊन दरम्यान त्यांच्यात एक बॉन्ड तयार झाला आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. रकुल आणि जॅकीने 2021 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आज हे कपल विवाहबंधनात अडकले. रकुलचा नवरा जॅकीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी देखील तो चित्रपट प्रोड्युस करत चांगली कमाई करतो. जॅकी भगनानी कोट्यवधीचा मालक आहे.
जॅकी भगनानी हा सुप्रसिद्ध निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे. वासू भगनानी यांनी गोविंदाच्या 'कुली नंबर 1' या चित्रपटात निर्माता म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. वासू भगनानी यांनी आपल्या मुलाला देखील हिरो बनवण्याचा निर्णय घेतला. जॅकीने २००९ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
जॅकी भगनानीने 'कल किसने देखा' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील वासू भगनानी यांनी केली होती. परंतू तयांच्या पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. जॅकी भगनानी शेवटी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फ्रेंड्स' चित्रपटात दिसला होता. यावेळी जॅकीने यापुढे बॉलीवूडमध्ये हिरो म्हणून काम करणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने वडिलांप्रमाणे निर्माता बनून नशीब आजमावले आणि आज त्याचे नाव प्रसिद्ध निर्मात्यांच्या यादीत सामील झाले आहे.
आता जॅकी भगनानी एक यशस्वी निर्माता झाला आहे. त्यामुळे तो त्याच्या चित्रपटांमधून करोडो रुपये कमावतो. रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ३५ कोटी रुपये आहे. जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, जॅकीची कमाई ३५ कोटी रुपये आहे. तर अभिनेत्री रकुलची कमाई जॅकीपेक्षा जास्त आहे. रकुल वर्षाला ४९ कोटी रुपये कमवते. जॅकी भगनानीने ९ चित्रपटांमध्ये हिरो म्हणून काम केले आहे. मात्र, हे सर्व चित्रपट पडद्यावर फ्लॉप ठरले. जॅकीने २००१ मध्ये आलेल्या 'रेहना है तेरे दिल में' चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.