Rajesh Khanna: राजेश खन्नांच्या महिला चाहत्यांनी ओलांडली होती मर्यादा, कृत्य पाहून 'काका'ला झाला पश्चाताप...

७० च्या दशकात राजेश खन्नांची स्टाईल तरुण चाहत्यांना सर्वाधिक आवडायची. राजेश खन्नांची फॅन फॉलोइंग महिलांमध्ये सर्वाधिक होती.
Rajesh Khanna
Rajesh Khanna Saam Tv
Published On

Rajesh Khanna: हिंदी चित्रपटसृष्टीत 'काका' म्हणून प्रसिद्ध असलेले राजेश खन्ना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते. नेहमीच राजेश खन्ना यांचा चाहतावर्ग त्यांना कायमच अभिनयात सर्वश्रेष्ठ मानत. 70 च्या दशकात राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा निर्माण केला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या संबंधित काही रंजक गोष्टी...

Rajesh Khanna
Anant-Radhika: अंबानींच्या घरामध्ये लवकरच पार पडणार लग्नसोहळा, अनंत आणि राधिका मर्चंड यांचा साखरपुडा संपन्न

राजेश खन्ना यांनी दीर्घकाळ इंडस्ट्रीवर राज्य केले. ७० च्या दशकात राजेश खन्नांची स्टाईल तरुण चाहत्यांना सर्वाधिक आवडायची. राजेश खन्नांची फॅन फॉलोइंग महिलांमध्ये सर्वाधिक होती. बऱ्याच महिला चाहत्यांनी राजेश खन्नांचा फोटो लावत लग्नही केले आहे. याशिवाय अनेक महिला चाहत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. असे म्हणतात की त्या काळात अनेक महिला आपल्या आवडत्या स्टार्सना रक्ताने पत्र लिहायच्या.

Rajesh Khanna
Pathaan Movie Controversy: पठान सिनेमावर कात्री लागणार; सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना दिले आदेश

सोबतच अनेकदा अशाही चर्चा व्हायच्या की, राजेश खन्ना यांची पांढऱ्या रंगाची गाडी जिथे थांबायची तिथे मुली चुंबन करत लिपस्टिकने गुलाबी रंग लावायच्या. त्याच बरोबर अनेक मॅगझीनमध्ये असेही नमूद केले आहे की, मुली राजेश खन्नांच्या गाडीवरची धूळ स्वतःच्या भांगेत कुंकू म्हणून भरायचे. राजेश खन्ना यांच्यासारखे चाहते अद्यापही कोणत्याच कलाकाराला मिळालेले नाहीत.

Rajesh Khanna
Rajesh Khanna: ७०च्या दशकातील सुपरहिट अभिनेता राजेश खन्नाचा असा होता जीवनप्रवास...

तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकले. 'आराधना', 'सच्चा झूठा', 'कटी पतंग', 'हाथी मेरे साथी', 'मेहबूब की मेहेंदी', 'आनंद', 'आन मिलो सजना', 'आपकी कसम' या त्यांच्या चित्रपटांनी कमाईचे नवे विक्रम रचले. 'आनंद' हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जाऊ शकतो. या चित्रपटात राजेश यांनी कर्करोगग्रस्त तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाने राजेश यांनी चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com