Anant-Radhika: अंबानींच्या घरामध्ये लवकरच पार पडणार लग्नसोहळा, अनंत आणि राधिका मर्चंड यांचा साखरपुडा संपन्न

राधिका मर्चंड लवकरच होणार अंबानी घराची धाकटी सून होणार आहे.
Anant and Radhika for their Roka ceremony
Anant and Radhika for their Roka ceremonyInstagram @mpparimal

Radhika Merchant Engaged To Anant Ambani: अंबानी कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अंनत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्यांच्या रोका (साखरपुडा) पार पडला आहे. अंबानी यांच्या या समारंभाचे फोटो व्हायरल होत आहेत. हा समारंभ राजस्थान येथील श्रीनाथजी मंदिरात पार पडला.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचे लग्न कधी होणार, यांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अनंत आणि राधिका गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. राधिका अंबानी कुटुंबियांच्या प्रत्येक समारंभात उपस्थित असते. तसेच लवकरच राधिका अंबानी घराची धाकटी सून होणार आहे. (Mukesh Ambani)

राधिका मर्चंड, विरेन मर्चंड आणि शैला मर्चंड यांची उलागी आहे. विरेन मर्चंड एनकोर हेल्थकेअर ब्रँडचे सीईओ आहेत. राधिकाच्या शालेय शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती न्यूयॉर्कला गेली. तिथे तिने राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात शिक्षण घेतले आहे. २०१७ साली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर राधिकाने इसप्राव टीममध्ये सेल्स एक्सिक्युटीव्ह जॉईन झाली. राधिकाला वाचन, ट्रेकिंग आणि स्विमिंग करण्याची आवड आहे.

राधिका आणि अनंत लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. राधिका नई अनंत यांचा एक फोटो २०१८मध्ये व्हायरल झाला होता. फोटोमध्ये दोघेही मॅचिंग रंगाच्या ग्रीन आऊटफिटमध्ये दिसले होते. (Photo)

राधिका एक ट्रेन इंडियन क्लासिकल डान्सर आहे. जून २०२२मध्ये अंबानी कुटुंबीयांनी आपल्या होणाऱ्या सुनेसाठी अरंगेत्रम सेरेमनी होस्ट केली होती. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राधिकाने क्लासिकल डान्स केला होता. तिच्या या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाले होते. राधिकाच्या डान्स पाहून सगळेजण तिचे कौतुक करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com