बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शनिवार आणि रविवारी बिग बॉसच्या घरात 'भाऊचा धक्का' असतो. सध्या प्रेक्षकांमध्ये 'भाऊचा धक्का'ची जोरदार चर्चा सुरू आहे. आजचा एपिसोड फक्त प्रेक्षकांसाठीच नाही तर, स्पर्धकांसाठीही खास असणार आहे. कारण आहे, आजच्या 'बिग बॉस मराठी'च्या एपिसोडमध्ये 'खेल खेल मैं' चित्रपटाची टीम उपस्थित राहणार आहे.
'बिग बॉस' शो हा अनेक प्रसिद्ध रिॲलिटी शोपैकी एक आहे. या शोमध्ये अनेक कलाकार प्रमोशनसाठीही उपस्थित राहत असतात. अशातच आता या रिॲलिटी शोमध्ये काही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती राहणार आहेत. 'खेल खेल मैं' चित्रपटानिमित्त 'भाऊचा धक्का'वर खास बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटाची टीमही उपस्थित राहणार आहे. नुकताच कलर्स मराठीकडून आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, 'खेल खेल मैं'च्या टीमने सर्व स्पर्धकांमध्ये मराठीमध्ये संवाद साधला. प्रोमोमध्ये अक्षय कुमार वर्षा उसगांवकर ह्यांना म्हणतो, "वर्षा किती वर्षांनी दिसतेस" अक्षयच्या प्रश्नावर वर्षाताईंच्या चेहऱ्यावर हास्य येते. त्यानंतर अक्षय कुमार डीपीला विचारतो,"घरात मटन मिळतंय की नाही ?" त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर सूरज चव्हाण, रितेश देशमुख आणि खिलाडी कुमार झापुक झुपुक थिरकताना दिसतात. सूरजने झापुक झुपूक डान्स बिग बॉसच्या घरातून केला. तर रितेश देशमुख आणि खिलाडी कुमारने डान्स स्टेजवरून केला.
बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. यापूर्वी एकदाच सलमान खानने उपस्थिती लावली होती. ‘भाऊचा धक्का’च्या एपिसोडमध्ये रितेश देशमुख कोणकोणत्या स्पर्धकाची कानउघडणी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याशिवाय कोणत्या स्पर्धकाला प्रेक्षकांकडून सर्वाधिक मतं मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोणत्या स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार ? हे आजच्या एपिसोडमध्ये कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.