Bigg Boss Marathi 5 : "गेम कळला नाही, पण माणसं कळली...."बिग बॉसच्या घरात गुलिगत सूरज चव्हाणची पुन्हा एकदा चर्चा

Goligat Suraj Chavhan News : बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनमध्ये गुलिगत सूरज चव्हाण कमालीचा चर्चेत आला आहे. सध्या सूरज चव्हाण घरातील त्याच्या खास खेळीमुळे चर्चेत आला.
Bigg Boss Marathi 5 Latest News
Goligat Suraj Chavhan NewsSaam Tv
Published On

बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठीचा दुसरा आठवडा सुरू आहे. घरातील सर्व सदस्य प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये मराठी सेलिब्रिटींसोबतच सोशल मिडिया एन्फ्लूएंसरही अनेक स्पर्धक म्हणून आपल्याला दिसत आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच गुलिगत सूरज चव्हाण कमालीचा चर्चेत आहे. सध्या सूरज चव्हाण घरातील त्याच्या खास खेळीमुळे चर्चेत आला.

Bigg Boss Marathi 5 Latest News
Akshay Kumar Donates For Haji Ali : खिलाडी अक्षय कुमारची हाजी अली दर्ग्याला कोट्यवधींची देणगी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

ज्यावेळी सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून आला, त्यावेळी त्याला खेळ कळलाच नव्हता. त्यामुळे सूरज चव्हाणवर अनेक स्पर्धकांनी टीका केली होती. त्याला पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट केले होते. पण चाहत्यांनी दिलेल्या सर्वाधिक मतांमुळे सूरज सेफ झाला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून सूरजने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

Bigg Boss Marathi 5 Latest News
Mahesh Babu Net Worth : मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणाली, "सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं..." त्यावर पॅडी म्हणतो,"बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता...." त्यावर अंकिता म्हणाली, "सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली...." या प्रोमोमुळे सूरज चव्हाणचे कौतुक केले जात आहे.

भारतात टिक टॉक असताना सूरज चव्हाणचा टॉप १० यादीमध्ये समावेश झाला होता. त्याच्या खास स्टाईलची तेव्हापासून ते आजवर कायमच नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा झाली आहे. सूरज चव्हाणचे नेटकऱ्यांकडून त्याच्या रिलचे चांगलंच कौतुक होत आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घरदेखील गाजवत आहे.

Bigg Boss Marathi 5 Latest News
Naga Chaitanya And Sobhita Love Story : पहिली भेट कुठं, प्रेम कसं फुललं? नागा चैतन्य अन् शोभिताची लव्हस्टोरी Revealed

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com