
मुंबई: 'बिग बॉस मराठी ४' (Bigg Boss) सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात वादविवाद, भांडण याची सुरूवात पहिल्याच दिवसापासून झाली होती. चावडीवर महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) सर्वच स्पर्धकांची शाळा घेतली. महेश मांजरेकरांनी स्पर्धकांचे कान टोचल्यावर त्यांचे वागणे बदलेले अशी 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांना अपेक्षा आहे. परंतु घरातले वातावरण बदलण्याची शक्यता फारच कमी आहे.
'बिग बॉस'च्या घरातील समृद्धी जाधव ही या सीझनची पहिली कॅप्टन झाली आहे. किरण मानेला समृद्धी बाबा म्हणते परंतु तिनेच त्याला एलिमिनेट केले होते. त्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात कधी काय होईल हे सांगणे तसे कठीणच आहे. इथे फक्त स्पर्धकांना स्वतःसाठी खेळायचे असते. आरडा-ओरड करून, सेफ खेळून, न बोलून इथे चालत नाही. 'बिग बॉस'च्या घरात प्रत्येकाला स्वतःची बाजू घ्यावी लागते.
विकास त्याची बाजू मांडत न आल्याने 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. किरण माने, अपूर्वा नेमळेकर, मेघ घाडगे आणि विकास सावंत यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आहे. मेघ घाडगे विकासशी जोरजोरात भांडत आहे. तर अपूर्व 'ए किरण माने तो त्याच बोलेल ना तुला काय करायचं आहे' असे किरण आणि विकासला खडसावत आहे. अमृता देशमुख, अमृता धोंगडे, तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे आणि निखिल राजेशिर्के या चौघांना समजावत आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे.
कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इंस्टाग्रामवर (Social Media) प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो बघून तुमच्या लक्षात येईल की आजचा एपिसोड किती धमाकेदार असणार आहे. 'बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी!' असे कॅप्शन त्या व्हिडीओला दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.