Debina And Gurmeet Viral Video: देबिना-गुरमीतचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

गुरमीत चौधरी आणि देबिना चौधरी दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत.
Debina And Gurmeet
Debina And GurmeetInstagram @guruchoudhary
Published On

मुंबई: देबिना आणि गुरमीत (Debina And Gurmeet) सोशल मीडियावरील प्रसिद्ध जोडी आहे. या जोडीवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. देबिना आणि गुरमीत यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. देबिना आणि गुरमीतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. दोघेजण पुन्हा आई-वडील होणार आहेत. हा आनंद साजरा करत एक रोमँटिक व्हिडीओ त्यांनी शूट केला आहे.

Debina And Gurmeet
Siddhant Chaturvedi: या' 3 ग्लॅमरस अभिनेत्रींमुळे 'गली बॉय' फेम अभिनेता सोडणार बॉलिवूड?

देबिना आणि गुरमीतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. देबिनाचा ब्लॅक ड्रेस हाय स्लिट असून त्यात बेबी बंप (Baby Bump) स्पष्ट दिसत आहे. गुरमीतने ब्लॅक सूट ब्लॅक कार्लच्या शूजसोबत पेअर केले आहे. दोघेही या व्हिडिओमध्ये (Video) अप्रतिम दिसत आहेत. डान्स पोसमध्ये उभे राहून एकमेकांकडे बघत दोघेही प्रेमात बुडालेले दिसत आहेत. व्हिडिओला देबिनाने कॅप्शन देखील दिले आहे. त्यात तिने लिहिले आहे की, 'जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू माझा श्वास घेऊन घेलास. तू आताही रोज तेच करतोस.' देबिना आणि गुरमीतचे लग्न २०११ साली झाले होते.

देबिना आणि गुरमीत २००८ साली रामायण या कार्यक्रमादरम्यान भेटले. या कार्यक्रमात देबिनाने सीताची भूमिका साकारली होती तर गुरमीतने रामाची. एप्रिलमध्येच देबिनाने मुलीला जन्म दिला होता. याच वर्षी ऑगस्टमध्ये देबिना आणि गुरमीतने आपल्या मुलीसह फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई-वडील होणार असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर यासाठी दोघांना भरपूर ट्रोल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com