Chota Pudhari Haldi Ceremony: ‘बिग बॉस मराठी ५’मधून ओळखला जाणारा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याने त्याच्या हळदी समारंभाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यामुळे आता सुरज चव्हाणनंतर तो पण लग्न करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
व्हिडीओमध्ये पारंपरिक हळदी विधी सुरु असताना घनश्याम घरातील कपड्यांमध्ये दिसतोय त्याची आईने त्याला हळदी लावत दिसत आहे. त्याने त्याच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे, “नवरदेव झालो ना राव… हळद लागली एकदाची… माझं पण ठरलं बरका… यायला लागतंय”. या कॅप्शनमुळे अनेकांनी असा अंदाज बांधला आहे की त्याचे लग्न लवकरच होणार आहे.
या व्हिडीओला चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या मात्र काहींनी त्याच्या वयानुसार हे थोडं लवकर असल्याचं सांगत टीका केली. काहींनी कमेंटमध्ये “बालविवाह करु नये” सारखी टीका देखील केली आहे.
मात्र, आधी झालेल्या चर्चांमध्ये घनश्यामने स्वत: स्पष्ट केलं होतं की, काही अफवा पसरल्या होत्या. ज्यात त्याच्या निधनाची देखील चर्चा होती; त्यावेळी त्याने एक व्हिडीओद्वारे ते खोटं असल्याचं सांगितलं आणि सर्वांना सांगितलं “मी ठिक आहे, माझं काही झालेलं नाही”. यासह या व्हिडीओच्या शेवटी कळते की तो त्याच्या हळदीचे आणि लग्नाच्या खरेदीचे फक्त स्वप्न बघतं होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.