Ankita Walawalkar: लग्नाची अन् बिग बॉसची ऑफर एकाच दिवशी...कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने दिली प्रेमाची कबुली

Ankita Walawalkar Confess Her Love: सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावकरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. दरम्यान, अंकिताने सोशल मीडियाद्वारे तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Ankita Walawalkar
Ankita WalawalkarSaam Tv
Published On

'बिग बॉस मराठी'च्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने एन्ट्री घेतली आहे. अंकिता बिग बॉस मराठीमध्ये दिसत असल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. बिग बॉस मराठीमध्ये येताच अंकिता वालावलकरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अंकिताने सोशल मीडियाद्वारे आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल माहिती दिली आहे. बिग बॉस मराठीमध्ये येण्यापूर्वी अंकिताचे लग्न ठरले होते. लग्न करायचा निर्णय घेतला आणि अंकिताला बिग बॉसची ऑफर आली. परंतु या काळात अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला साथ दिली. त्यामुळेच अंकिताने या खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

Ankita Walawalkar
Bigg Boss Marathi 5 Contestant : ‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री! पाहा संपूर्ण यादी, जाणून घ्या नावं

अंकिताने सोशल मीडियावर केक, लाल रंगाचे फुगे, गुलाबाचे फोटो शेअर केले आहे. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्यासाठी खास सरप्राईज प्लान केलं होतं. तिच्यासाठी केक आणून सेलीब्रेशन केले होते. याचसोबत अंकिताने खास व्यक्तीच्या हातात हात घालून फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अंकिताने 'Dear kokanheartedboy, रात्री २ वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण big boss मधे जाण्यासाठी २ दिवस बाकी उरलेत फक्त..खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलस. तुझे शब्द माझी ताकद आहेत.तु हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघुन आई पण निश्चिंत आहे.तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन हया नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. जेव्हा लग्न करु अस आपण ठरवलं आणि big boss ची ऑफर आली,माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास “माझा विचार नको करूस ,मी आजही आहे ,उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा” ”लवकर ये पण जिंकुन ये,आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग,जिंकण्यासाठी fake वागु नकोस,हरलीस तरी चालेल“ हे सगळं लक्षात ठेऊन जातेय,लवकरच येईन पण छान राहुन येईन,तू तयारीला लाग. तुझ्यासोबत १९५ देश फिरायचे आहेत. फुलांची खूप आठवण येईल.येते.ता.क.- dyson चा बॉक्स फाडून यशस्वी भव: लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल', असं कॅप्शन या पोस्टवर दिलं आहे.

Ankita Walawalkar
Bigg Boss Marathi 5 Contestant: वर्षा उसगांवकर ते सूरज चव्हाण; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात १६ स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री, वाचा कलाकारांची यादी

अंकिताच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अंकिता लवकरच लग्न करणार असल्याचे तिने पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. अंकिता 'बिग बॉस'च्या घरात या खास व्यक्तीचं नाव सांगणार का?हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Ankita Walawalkar
Shivani Surve-Ajinkya Nanaware: मालिकेच्या सेटवर प्रेम, कुटुंबाचा विरोध; लिव्ह इन रिलेशनशिप...;अशी आहे शिवानी सुर्वे- अजिंक्य ननावरेची लव्हस्टोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com