Arbaz-Nikki: अरबाज आणि निक्कीचं हॅशटॅग arnik नेमकं आहे तरी काय? सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

Arbaz-Nikki Relation: बिग बॉसच्या घरातील अरबाजचा खेळ संपला असून देखील या दोघांबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
Arbaz-Nikki
Arbaz-NikkiSaam Tv
Published On

बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी ही जोडी कायमच चर्चेची ठरली. बिग बॉसच्या घरातील कोणताही टास्क, स्पर्धकांच्या जोड्या, प्रेम आणि भांडणे असो हे दोघे कायमच लाईमलाईटमध्ये राहिले. पहिल्या आठवड्यापासून अरबाज आणि निक्की एकमेकांचे चांगले मित्र झाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील अरबाजचं निक्कीची मैत्री दिसून येते आहे.

Arbaz-Nikki
Bigg Boss Marathi Finale Task: 'या' ७ स्पर्धकांमध्ये रंगला अनोखा टास्क; कोण जाणार फायनलला?

अरबाज घरातून बाहेर पडल्यानंतर निक्कीवरचं त्याचं प्रेम कमी होत नाही. अरबाज आणि निक्की मैत्री बिग बॉसच्या घरात झाली. या दरम्यान अरबाज घरातून बाहेर पडताना निक्की नाराज झाली होती. अरबाजने बिग बॉसच्या घरात निक्की माझा कम्फर्ट झोन होती. ती माझी काळजी घ्यायची आमचं बॉन्डींग खूप छान असल्याचं म्हटलं होते. बिग बॉसच्या घरात निक्की आणि अभिजीतची पाहून अरबाजने तिच्याशी वाद घातलेला दिसला होता. त्याने घरातील सर्व भांड्याची आदळाआपट देखील केली होती. अशातच दिवसेंदिवस या दोघांच्या जवळीक पाहून सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यावर नेटकऱ्यांकडून प्रश्न निर्माण होत होते. नेटकऱ्यांनी हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं होतं तर अनेकांनी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले अश्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

बिग बॉसच्या घरातील अरबाजचा खेळ संपला असून देखील या दोघांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. अरबाजने देखील त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅडलवर या दोघांच्या बिग बॉसच्या घरातील पोस्ट शेअर केल्या आहेत. रोमॅटिंक अंदाजातील या दोघांच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून तुफान लाईक्स येत आहेत. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अरबाजने #arnik #nikbaz असे हॅशटॅग देखील दिले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबाबत अटकळ्या लावल्या जात आहेत.

अरबाजने त्याच्या एका मुलाखतीत देखील निक्कीवरील त्याच्या नात्यावर भाष्य केलं. अरबाजला निक्कीला प्रपोज करण्याविषयी केलेल्या प्रश्नावर अरबाजने, जर मी निक्कीला प्रपोज केले तर ते माझ्यासाठी खूप स्पेशल असेल असं म्हटलं आहे. पुढे त्याने निक्कीला हे नातं पुढे न्यायचं असेल तर मी कॅमेऱ्यासमोर प्रपोज करेन असं म्हटलं आहे. अरबाजने निक्कीला तू स्ट्राँग आहेस ट्रॉफी जिंकून ये अश्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Arbaz-Nikki
Amruta Khanvilkar: अमृता खानविलवकरच्या मोबाईल वॉलपेपरवर आहे खास फोटो, तुम्ही पाहिलात का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com