Bigg Boss 6: आता सगळे होणार बेभान; 'या' दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी 6', रितेश भाऊची खास घोषणा

Bigg Boss 6: 'बिग बॉस मराठी 6' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत परतणार असून, शोची थीम आणि संभाव्य स्पर्धकांबाबत मोठी चर्चा रंगली आहे.
Bigg Boss 6
Bigg Boss 6Saam Tv
Published On

Bigg Boss 6: लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा धमाकेदार शो 11 जानेवारी 2026 पासून दररोज रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवीन सिझनचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रमोमध्ये रितेश देशमुखचा दमदार प्रवेश पाहायला मिळतोय. त्याच्या खास अंदाजात आणि स्वॅगमध्ये “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय” असे संवाद प्रेक्षकांचे उत्साहाचे वातावरण अजूनच वाढलं आहे. मागच्या सीझनप्रमाणेच यंदाही रितेश भाऊ होस्ट म्हणून शोचे सूत्रसंचालन करणार आहेत, यामुळे या भागात डबल धमाका येणार आहे.

Bigg Boss 6
Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

नवीन प्रोमोचे वातावरण खूप भव्य आणि तुफानी दाखवले आहे. ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तिथे उपस्थित प्रेक्षकांची दणदणीत ऊर्जा ही या सिझनची विशेष शैली दाखवते. यामुळे शोची थीमसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

स्पर्धकांबद्दल अद्याप अधिकृत यादी जाहीर झालेली नाही, परंतु सोशल मीडियावर आणि चाहत्यांच्या चर्चांमध्ये कंटेस्टंट्स कोण असतील? याबद्दल भरभरून चर्चा सुरू आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांचे आणि इन्फ्लुएंसरचे नाव चर्चेत आणले आहे, पण अजून निश्चित माहिती मिळालेली नाही. चाहत्यांना कोणत्या हटके आणि मनोरंजक स्पर्धकांची अपेक्षा आहे याबद्दल विविध मतं आहेत.

Bigg Boss 6
Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

एकूणच, ‘बिग बॉस मराठी 6’ या सीझनची घोषणा मराठी मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. रितेश देशमुख यांच्या होस्टिंगसह हा सीझन 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून, प्रेक्षकांना आणखी अनेक ट्विस्ट, ड्रामा आणि मनोरंजन अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com