
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक उत्तम आशयघन चित्रपट पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे, ‘तेरव’. स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारा हा चित्रपट ८ मार्चला रिलीज झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा चित्रपट संवेदनशील विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. नुकतंच अभिनेता किरण माने यांनी ‘तेरव’ चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये कथानकावर भाष्य केले आहे. किरण माने आपल्या पोस्टमध्ये बोलतात, "माझी एक महत्त्वपूर्ण भुमिका असलेल्या 'तेरवं' सिनेमा मी काल पाहिला. दिग्दर्शक हरिश इथापेनं पहिल्याच चित्रपटातून पुढच्या वादळाची झलक दाखवली आहे. मातीशी इमान आणि कष्टकरी समाजाविषयी कळवळा असण्याबरोबरच 'सिनेमा' तंत्रात अभ्यासू, प्रतिभावंत असण्याचं काॅम्बीनेशन असलेले दिग्दर्शक मराठीत लय मोजके आहेत. त्यात हरिश इथापेनं नक्कीच स्थान मिळवलंय. शेतकरी आत्महत्या करुन निघून जातो... पण त्यानंतर मागे राहिलेली त्याची बायको 'जगण्यासाठी' जो संघर्ष करते त्यावर कुणीच बोलत नाही. 'तेरवं' चित्रपटामध्ये हतबल बळीराजाच्या कणखर मर्दिनीचा जगण्यासाठीचा झगडा प्रभावीपणे दाखवलाय."
किरण माने पुढे पोस्टमध्ये बोलतात, "प्रमुख भुमिकेत अभिनेत्री किरण खोजेनं कमाल केलीय. किरण आणि मी यापूर्वी 'मायलेकी' नाटकात एकत्र काम केलं होतं. अहमदनगरसारख्या गावातनं थेट एनएसडी आणि तिथून हा लीड रोलपर्यंतचा प्रवास मी जवळून बघितलाय. तिनं संधीचं सोनं केलंय. मनोरंजन करणारे सिनेमे, स्कीटस्, रिल्स हे रोज बघतोच आपण... पण त्याचबरोबर आपल्या अन्नदात्यासाठीची 'जाणीव' म्हणून असा एक गांभीर्यानं बनवलेला आशयघन सिनेमा बघा.. जवळच्यांना दाखवा. आज क्रूर सत्ताधार्यांनी आणि त्यांच्या हिंस्त्र भक्तपिलावळीनं शेतकर्यांना देशद्रोही ठरवून मातीशी नमकहरामी केलेली असली तरी आपल्यात माणुसकी शिल्लक आहे, हे दाखवून देऊया..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.