Mannara Chopra got angry on Ankita Lokhande and Isha
Mannara Chopra got angry on Ankita Lokhande and Isha Saam TV

Bigg Boss 17 Update: Bigg Boss Update: 'ज्युनिअर अंकिता बनू नको' 'वीकेंड का वार'मध्ये मनाराने ईशावर काढला आठवड्याभराचा राग

Weekend Ka Vaar: 'बिग बॉस १७'च्या पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये काय होणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे.
Published on

Kangana Ranaut Host BB 17 on behalf of Salman Khan:

सलमान खान होस्ट करत असलेला एकमेवच टीव्ही शो 'बिग बॉस १७' सुरू होऊन आठवडा झाला. आज पहिला 'वीकेंड का वार' पार पडणार आहे. या 'वीकेंड का वार' स्पर्धकांसह प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

'बिग बॉस १७'च्या पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये काय होणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाला पाठिंबा देणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पहिल्या 'वीकेंड का वार'ला अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे.

कलर्स टीव्हीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कंगना रनौत 'बिग बॉस'च्या स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसत आहे. कंगना तिच्या आगामी चित्रपटातील एक डायलॉग प्रश्नाच्या स्वरूपात स्पर्धकांना विचारते.

कंगना, अंकिताला विचारते, 'बिग बॉसच्या घरात असं कोण आहे ज्यांना कोणी छेडलं तर तुम्ही सोडणार नाही?' यावर अंकिता उत्तर देते, 'या घरात माझं एका व्यक्तीशी नातं तयार झालं आहे आणि ती आहे ईशा. मला तिला प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीपासून प्रोटेक्ट करायचे आहे, विशेष म्हणजे मनारापासून.' असे बोलून अंकिता मनाराच्या डोक्याला एक टॅग लावते.

अंकिताच्या या बोलण्यावर स्पष्टीकरण देत मनारा म्हणते की, 'ईशाचा एक पॉईंट ऑफ View' असायला हवा. तिला ज्युनिअर नदीत बाण्याची गरज नाही. तिने ईशाचा राहावं' मनाराचं हे बोलणं ऐकून ईशा खूप शॉक होत आणि अंकिताकडे पाहू लागते. (Latest Entertainment News)

Mannara Chopra got angry on Ankita Lokhande and Isha
Tiger Shroff In Metro: किती कॉपी करणार? हृतिकनंतर आता टायगर श्रॉफचा मेट्रो प्रवास; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांची कमेंट

कलर्स टीव्हीने व्हिडीओ शेअर करता नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. 'मनाराने अंकिता आणि ईशाला दोन सेकंदात उघड पडलं', 'मनारा अगदी खरं बोलली', 'अंकिता आणि इशा दोघीही वाईट आहेत', 'मनारा तो योग्य बोलली आहेस', अशा कमेंट करत नेटकरी मनाराला पाठिंबा देत आहेत.

कंगनासह या 'बिग बॉस १७' पहिल्या वीकेंड वारमध्ये क्रिती सेनन आणि टायगर श्रॉफ त्यांच्या 'गणपत' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. त्यांचा हा चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com