शमिता शेट्टीचे राकेश बापटसोबत ब्रेकअप? बिग बॉस 15 स्टारने सोडले मौन

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे प्रेम ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाहायला मिळाले होते.
Shamita Shetty And Raqesh Bapat
Shamita Shetty And Raqesh BapatSaam Tv
Published On

बिग बॉस 15 संपल्यानंतरही बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) सतत चर्चेत असते. बिग बॉसच्या काळातच राकेश बापटसोबत शमिताची जवळीक वाढली होती. शो संपल्यानंतर राकेश बापट देखील शमिता शेट्टीच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसला. शमिता शेट्टीने राकेश बापटसोबतचे ब्रेकअप केल्याचा दावा नुकताच एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, शमिता आणि राकेश यांचे मत जुळत नसल्यामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा -

हा दावा ऐकल्यानंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. शमिता शेट्टीने एका पोस्टद्वारे खुलासा केला की त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या केवळ अफवा आहेत. इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना शमिता शेट्टीने तिच्या आणि राकेश बापटमध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनेत्रीने लिहिले, 'आम्ही आवाहन करतो की तुम्ही आमच्या नात्याशी संबंधित अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. यात तथ्य नाही. शमितानंतर राकेश बापटनेही अशाच पद्धतीने ब्रेकअपच्या बातम्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

Shamita Shetty And Raqesh Bapat
उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करणार की कंगाल?

चाहते आता शमिता शेट्टी आणि राकेश बापट त्यांच्या लग्नाची घोषणा कधी करणार याची वाट पाहत आहेत. अलीकडेच राकेश बापट, शमिता शेट्टी आणि तिच्या आईसोबत रेस्टॉरंटमध्ये दिसला होता. अशा स्थितीत शमिता आणि राकेशने हळूहळू लग्नाची तयारी सुरू केली असल्याचा अंदाजही लोकांनी लावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com