उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करणार की कंगाल?

दोन महिने उलटूनही अनेक ठिकाणी फुले आली नसल्याने चिंता
Latur News
Latur Newsदीपक क्षीरसागर

लातूर - गत दोन वर्षापासून सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने उन्हाळी सोयाबीन घेण्याची क्रेझ शेतकऱ्यांमध्ये (Farmer) वाढली आहे. यंदाही १ हजार ७२४ हेक्टरवर जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनचा (Soybean) पेरा झाला आहे. मात्र पेरा होऊन दोन महिने उलटले तरी फुले न आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

उन्हाळी सोयाबीन ९० ते १०० दिवसांत येते. मात्र यंदा पेरा होऊन दोन महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये सोयाबीनला फुले आली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही प्लॉटमध्ये फुलांचे प्रमाण कमी असून काही प्लॉटमध्ये चांगला फुलोरा आहे. कही खुशी कही गम अशी स्थिती सध्या तरी दिसत आहे. मात्र सध्या सोयाबीनला चांगला भाव आहे. ७ हजार ३०२ रुपये प्रति क्विंटल दर गेल्याने उन्हाळी सोयाबीन करेल अशी अपेक्षा दिसते.

हे देखील पहा -

जिल्ह्यात खरिपातील सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. परंतु, उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र आणखीन वाढलेले नाही. परंतु हे पीक घेण्याला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात या हंगामात १ हजार ७२४ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यामध्ये दीड हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला होता.

Latur News
निकालानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो; गुजरात निवडणुकीची तयारी सुरु

दिवसांमध्ये उन्हाळी उन्हाळी सोयाबीनचे पीक आम्ही गतवर्षी सुरू केले आहे. यंदा साडेचार एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन आहे. काही ठिकाणी चांगले फुलात आहे. तर काही ठिकाणी कमी फुले आहेत. काही शेतकयांच्या प्लॉटमध्ये फुलाचे प्रमाण अत्यल्प आहे. तर काहींच्या शेतात बऱ्यापैकी फुले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी कमी उतारा येईल, अशी शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com