Salman Khan: चर्चा तर होणारच! भाईजानचं जडलं अर्ध- वयाच्या मुलींशी प्रेम

सलमान खान पुन्हा एकदा आता प्रेमात पडल्याचे समोर आले आहे.
Salman Khan
Salman Khan Saam Tv
Published On

मुंबई: सध्या इंडस्ट्रीत बॉलिवूड अभिनेता सलमान खानची ( Salma Khan) चर्चा रंगली आहे. अभिनेता सलमान खान त्याच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफबाबत कायमच प्रकाशझोतात असतो. नुकतंच सलमानच्या लव्ह लाईफची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सलमान खान पुन्हा एकदा आता प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. दोंघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहीती समोर आली आहे.

Salman Khan
Ranbir Kapoor: 'कलाकाराला मर्यादा नसतात…' रणबीरला करायचे आहे 'या' पाकिस्तानी कलाकारासोबत काम

अभिनेता सलमान खानने आजवर अनेक अभिनेत्रींना त्याच्या जाळ्यात अडकवले आहे. मात्र यापैकी कोणासोबतही तो त्याची गाठ बांधू शकला नाही असे असताना अभिनेता सलमानचे प्रेम कॉलीवूड, टॉलीवूड आणि बॉलिवूड अभिनेत्रीशी जुळल्याचे समोर आले आहे. सलमान खान प्रेमात पडला असल्याची ही बातमी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसलाच असेल, मात्र बॉलिवूडचा दंबग खानचं प्रेम अभिनेत्री पूजा हेगडे हीच्याशी असल्याचं समोर आले आहे. दोघेही आगामी चित्रपट किसी का भाई कीसी की जान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Salman Khan
Shah Rukh Khan Expensive Things: किंग खानची देशासह परदेशात कोट्याधीशांची संपत्ती, संपत्ती जाणून थक्क व्हाल…

सलमानने पूजा हेगडे अभिनेत्रीला आपल्या चित्रपटामध्ये ब्रेक दिला आहे. ती टॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तिनं दमदार भूमिका केल्या आहेत. आपल्यापेक्षा वयानं २४ वर्षांहून लहान असणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात सलमान पडल्यानं त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे दुसरीकडे त्याला ट्रोलही केले आहे.

उमैर संधूच्या एका ट्विटने सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. सलमान आणि पूजा रिलेशनशिपमध्ये असल्याचे उमेरचे म्हणणे आहे. उमेरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ब्रेकिंग न्यूज… चित्रपटसृष्टीत आणखी एक नवं जोडपं समोर आले आहे. सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडल्याची चर्चा होत आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनेही पूजाला त्याच्या दोन चित्रपटांसाठी साइन केले आहे. हे दोघे सध्या एकत्र वेळ घालवत असून सलमानच्या जवळच्या मित्रानेही याला दुजोरा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com