Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Avatar 3: जेम्स कॅमेरॉनचा "अवतार: फायर अँड अ‍ॅशेस" हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच हिट ठरला आहे हा चित्रपट "अवतार: द वे ऑफ वॉटर" चा सिक्वेल आहे. काही प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर रडले आहेत.
Avatar 3
Avatar 3Saam Tv
Published On

Avatar 3: जेम्स कॅमेरॉनचा "अवतार: फायर अँड अ‍ॅशेस" हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याने रिलीज आधीच चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरून आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शननुसार .या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाभोवती होणारी प्रशंसा आणि चर्चा पाहता हा चित्रपट येत्या काळात विक्रमी कमाई करु शकतो.

"अवतार: द वे ऑफ वॉटर" च्या प्रदर्शनानंतर तीन वर्षांनी, जेम्स कॅमेरॉन तिसऱ्या भागासह "अवतार: फायर अँड अ‍ॅशेस" परतला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि असे दिसते की त्यांची वाट पाहणे सार्थकी लागले आहे. "अवतार ३" ला "मास्टरपीस" म्हणून गौरवण्यात येत आहे. एका नेटकऱ्याने हा चित्रपट ऑस्करसाठी पात्र असल्याचे सांगितले आहे.

Avatar 3
Weight Loss: दररोज सकाळी 'हे' काम केल्याने वजन होईल लवकर कमी, आठवडाभर करुन पाहा हे उपाय

या चित्रपटाबद्दल सांगताना एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'अवतार: फायर अँड ॲश' जबरदस्त ॲक्शनने भरलेला आहे. हा चित्रपट नक्कीचं लोकांना फार आवडेल. आणखी एकाने पोस्ट करत लिहीले, मी हा चित्रपट पाहताना ५ वेळा रडले. त्यातील काही भाग खरचं खूप भावूक करणारे आहेत.

Avatar 3
Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'अवतार: फायर अँड अ‍ॅशेस' भारतात २० कोटी रुपयांची कमाई करू शकतो. व्हरायटीच्या अहवालानुसार, 'अवतार ३' अमेरिकेत ९० दशलक्ष ते १०५ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ९ अब्ज रुपये) कमाई करण्यास सज्ज आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर, तो आदित्य धरच्या 'धुरंधर'ला मागे टाकू शकतो, जो गेल्या १४ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे.

"अवतार" चे पुढील दोन भाग २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होतील. "अवतार: फायर अँड अ‍ॅशेस" १७ डिसेंबर रोजी जर्मनी आणि फिलीपिन्समध्ये प्रदर्शित झाला आणि आता १९ डिसेंबर रोजी भारतासह उर्वरित जगात प्रदर्शित झाला. या फ्रँचायझीमधील आणखी दोन चित्रपट २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होतील. सध्या या दोन्ही भागांवर काम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com