PIFF2022: "औरंगजेबाने देशावर ५२ वर्ष राज्य केलं, काय बिघडवून घेतलं? हिंदुस्थान आजही जिवंत आहे" - जावेद अख्तर

Pune International Film Fest 2022: पुणे शहरात २० वे पिफ फेस्ट अर्थात, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्ट (Pune International Film Fest) ३ ते १० मार्च या काळात संपन्न होत आहे.
​​Javed Akhtar in pune international film festival, #PIFF2022
​​Javed Akhtar in pune international film festival, #PIFF2022Instagram/@piffindia
Published On

पुणे: पुणे शहरात २० वे पिफ फेस्ट अर्थात, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्ट (Pune International Film Fest) ३ ते १० मार्च या काळात संपन्न होत आहे. या फिल्म महोत्सवात (Pune International Film Fest 2022) प्रसिद्ध गीतकार जावेद अख़्तर (Javed Akhtar) यांनाही प्रवक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध विषयांवार आपली मतं मांडली. यावेळी इतिहासाचं महत्व सांगताना ते म्हणाले की, इतिहास खूप मोठा असतो. इतिहासात 50-100 वर्षांचा कालखंड आपल्यासाठी खूप काही महत्त्वाचं नसतं. ह्या देशावर औरंगजेब ने 52 वर्ष राज्य केलं, काय बिघडवून घेतलं त्यानं हिंदुस्थाचं? हिंदुस्थान आजही जिवंत आहे असं जावेद अख्तर म्हणाले. ("Aurangzeb ruled the country for 52 years, but Hindustan is still alive" ​​Javed Akhtar said in pune international film festival)

हे देखील पहा -

गीतकार जावेद अख्तरांनी त्याच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितलं की, ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना गुरुदेवजींच असिस्टंट बनायचं होतं. मात्र त्यांची कधी भेटच झाली नाही. पुढे ते म्हणाले, मी 10 - 12 वर्षाचा असताना मदर इंडिया चित्रपट पाहिला होता, त्यानंतर 15-16 वर्षांचा असताना गंगा-जमुना पाहिला, 13-14 वर्षांचा असताना यासा चित्रपट पाहिला, या चित्रपटांनी माझ्यावर प्रभाव टाकला असं म्हणत श्री 420 माझा आवडता चित्रपट आहे असं त्यांनी सांगितलं.

आर्थिक अडचणींमुळे गाडी विकावी लागली होती:

आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळाबदद्ल सांगताना ते म्हणाले की, आमच्यातही बंड होता, जंजिर चित्रपट हिट झाल्यानंतर आम्ही आमच्या स्क्रिप्टसाठी 2 लाख मागण्याच ठरवलं, मात्र आम्हाला 6-6 महिने कामं मिळाली नाही. आर्थिक अडचणींमुळे मला माझी गाडी विकावी लागली होती. शेवटी प्रेमजी यांनी आम्हाला स्क्रिप्टसाठी दोन लाख दिले अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच "रायटरला (लेखकाला) लिहिताना तो समाजाबद्दल काय लिहत आहे हे, त्याला अजिबात माहीत नसावं, कारण त्याला समाजातल प्रश्न माहीत असले तर तो कधीच चांगलं लिहू शकत नाही. रायटर जो लिहतो ते समाजाशी प्रासंगिक सुसंगत असावं तेव्हा तो चांगलं लिहू शकतो" असा सल्ला त्यांना लेखकांना दिला आहे.

स्मॉल टाऊन सिनेमाची नव्या पीडिला क्रेझ:

चित्रपटांबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, 70 च्या दशकातील हिरोज् आपल्या देशातील रस्त्यावरून निघायचे, 90 च्या दशकातील हिरोज् बंगल्यातून निघून थेट स्वीजरलँडच्या रस्त्यांवर दिसायचे. पण, आता आपण परत वास्तववादी सिनेमांकडे जात आहोत, स्मॉल टाऊन सिनेमाची नव्या पीडिला क्रेझ आहे असं म्हणत नव्या पीढीला पुन्हा वास्तववादी चित्रपट आवडू लागले आहेत असं निरिक्षण त्यांनी नोंदवलं.

हिंदुस्थान आजही जिवंत:

जावेक अख्तर यांनी इतिहासाबद्दल आपलं सडेतोड मत मांडलं आहे, ते म्हणाले की,
इतिहास खूप मोठा असतो. इतिहासात 50-100 वर्षांचा कालखंड आपल्यासाठी खूप काही महत्त्वाचं नसतं. ह्या देशावर औरंगजेब ने 52 वर्ष राज्य केलं, काय बिघडवून घेतलं त्यानं हिंदुस्थाचं? हिंदुस्थान आजही जिवंत आहे.

मातृभाषेचं महत्व:

अख्तर म्हणाले, इंग्रजी भाषा यायलाच हवी त्याला आजच्या घडीला पर्याय नाही. मात्र इंग्रजीशिवाय तुम्हाला तुमची मातृभाषा देखील यायला हवी. मातृभाषेशिवाय तुमची ओळख बनूच शकत नाही. मातृभाषा संपली की तुमची ओळख संपते, तुमची संस्कृती संपते असं म्हणत त्यांनी इंग्रजीसह मातृभाषेचं महत्व अधोरेखील केलं. तसेच, आज तुम्ही ज्यांना ऐकत आहात, पाहत आहात त्यांना आम्ही कधी आपली मातृभाषा दिलीच नाही, ही आपली शोकांतिका आहे असं ते म्हणाले.

​​Javed Akhtar in pune international film festival, #PIFF2022
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी 130 रशियन बसेस सज्ज

ज्यांच्याकडे शब्दकोष नाही ते स्क्रिप्टमध्ये शिव्या टाकतात:

चित्रपटांच्या संहितेबद्दल (स्क्रिप्टबद्दल) बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, ज्याच्याकडे चांगला शब्दकोष आहे, ते कधीच आपल्या स्क्रिप्टमध्ये शिव्या टाकत नाहीत. मात्र भाषेची आणि शब्दकोषाची गरिबी ज्यांच्याकडे असते ते आपली स्क्रिप्ट गाजविण्यासाठी स्क्रिप्टमध्ये शिव्या टाकतात.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com