Nandini Kashyap Hit And Run Case: लोकप्रिय अभिनेत्रीनं २१ वर्षीय विद्यार्थ्याला चिरडलं; अपघाताचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Nandini Kashyap Hit And Run Case CCTV : गुवाहाटीमध्ये हिट अँड रन प्रकरणात आसामी अभिनेत्री नंदिनी कश्यप हिला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्या एसयूव्हीने एका विद्यार्थ्याला धडक दिल्याचे दिसून आले आहे.
Nandini Kashyap  Hit And Run Case CCTV
Actress Nandini Kashyap arrested in Guwahati for allegedly running over a student with her SUV; CCTV footage goes viral.saam tv
Published On

गुवाहाटी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्री नंदिनी कश्यपला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी बुधवारी ३० जुलै रोजी दुपारी १.३० वाजता गुवाहाटी येथून नंदिनीला अटक केली. विद्यार्थ्याला चिरडण्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागलाय. दरम्यान अभिनेत्री नंदिनी कश्यपला न्यायालयात हजर केले जाणार. विद्यार्थ्याला कारने धडक दिली आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप अभिनेत्रीवर आहे.

गुवाहाटीच्या दक्षिणगाव भागात हा अपघात झाला होता. २५ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास २१ वर्षीय समीउल हक नावाचा विद्यार्थी रस्ता ओलांडत होता, त्यावेळी भरधाव जाणाऱ्या अभिनेत्रीच्या कारनं विद्यार्थ्याला उडवलं होतं.

समीउल हा नलबारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत होता. गुवाहाटी महानगरपालिकेत कंत्राटी नोकरीवर होता. कामावरून परतत असताना त्याला एका भरधाव एसयूव्ही कारने धडक दिली होती. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय.

Nandini Kashyap  Hit And Run Case CCTV
Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, अभिनेत्री नंदिनी यांची कार भरधाव वेगात जाताना दिसते. तर अभिनेत्रीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात आपण कार धिम्या वेगाने चालवतो होतो असं सांगितलंय. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र अभिनेत्री खोटं बोलत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी कश्यप एसयूव्ही चालवत होती. काही प्रत्यक्षदर्शी आणि अपघातस्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा दावा करण्यात आलाय.

Nandini Kashyap  Hit And Run Case CCTV
HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

अपघातानंतर गाडी लगेचच घटनास्थळावरून पळून गेली होती. त्यानंतर गुवाहाटी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यता पाहून तपास सुरू केला. त्यानंतर मध्यरात्री अभिनेत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर तिची खूप वेळ चौकशी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी आता तिला अटक केली. अपघाताच्या वेळी ती मद्यधुंद होती की नाही याचाही तपास पोलीस करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ (निष्काळजीपणे गाडी चालवणे) आणि ३०४अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, समीउलचे कुटुंब न्यायासाठी याचना करत आहे. सीमउल हक हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो तात्परत्या स्वरुपात महापालिकेत नोकरी करत होता. अपघातानंतर त्याला आधी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेव्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com