Aryan Khan : आर्यन खानचे शौक ऐकूण व्हाल थक्क; आलिशान कार, लेटनाईट पार्टी अन्...

अशाच एका पार्टीत अंमली पदार्थांप्रकरणी त्याला अटक झाली होती.
Aryan Khan Lifestyle
Aryan Khan LifestyleSaam TV
Published On

Aryan Khan Lifestyle: शाहरूख खान पुत्र आर्यन खान अंमली पदार्थांप्रकरणी चांगलाच चर्चेत आला होता. अशात आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. मात्र वडीलांप्रमाणे अभिनय नाही तर दिग्ददर्शक म्हणून त्याचा डेब्यू असणार आहे. अशात या बातमीमधून आर्यनच्या लाईफस्टाईल बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. (Latest Marathi News)

आर्यनने नेहमीच आलिशान आयुष्य जगले आहे. त्याला लेटनाईट पार्टी फार आवडतात. त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर पार्टीचे अनेक फोटो (Photo) पोस्ट केले आहेत. अशाच एका पार्टीत अंमली पदार्थांप्रकरणी त्याला अटक झाली होती.

Aryan Khan Lifestyle
Actress Rupali Bhosale: आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रियेचा अनुभव शेयर करताना झाली भावूक

आर्यनचं शिक्षण किती आहे?

आर्यनच्या शालेय शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो लंडनला गेला. तिथे त्याने १२ वी उत्तीर्ण केली. साल २०२० मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट, फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शन, सिनेमॅटिक आर्ट्स, स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स या विषयांमध्ये त्याने पदवी संपादन केली आहे.

Aryan Khan Lifestyle
Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त, करणार 'या' चित्रपटात काम

आर्यनला लेटनाईट पार्टीबरोबर आलिशान कारची देखील आवड आहे. त्याच्याकडे अनेक माहगड्या गाड्या आहेत. यात फरारी, बीएमडब्लू अशा मौल्यवान गाड्या आहेत. शाहरूख प्रमाणेच आर्यनच्या क्यूट लूकवर लाखो मुली फिदा आहेत. चित्रपटसृष्टीतील स्टार किडमध्ये आर्यन अनेकांचा फेवरेट आहे. सोशल मीडियावर तो नेहमीच सर्कीय असतो. नुकतेच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजले आहे. अशात आता चाहते त्याच्या डेब्यू चित्रपटाची आतुरतेने वाट वाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com