Lionel Messi Video : लिओनेल मेस्सीला पाहायला आलेले चाहते अजय देवगन अन् टायगर श्रॉफला पाहून संतापले, स्टेडियमवर उडाला गोंधळ

Lionel Messi - Wankhede Stadium Mumbai : लिओनेल मेस्सीला पाहायला आलेले चाहते अजय देवगन आणि टायगर श्रॉफच्या उपस्थितीमुळे संतापले. स्टेडियमवर गोंधळ उडाला. नेमक घडलं काय? जाणून घेऊयात.
Lionel Messi - Wankhede Stadium Mumbai
Lionel MessiSAAM TV
Published On
Summary

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी बॉलिवूड स्टार्स आणि सामान्य जनतेची मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गर्दी पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचे कौतुक केले.

अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पाहून चाहते संतापले.

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Footballer Lionel Messi ) भारत दौऱ्यावर आला आहे. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी एकमेकांना भेटले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी मेस्सीचे स्वागत केले. लिओनेल मेस्सील पाहण्यासाठी बॉलिवूडचे सेलिब्रिटी पाहायला मिळाले. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वानखेडे स्टेडियमवर येऊन अजय देवगण आणि टायगर श्रॉफने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेस्सीची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचे कौतुक केले. खरंतर स्टेडियममधील आयोजकांनी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींच्या सन्मान समारंभामुळे कार्यक्रमात व्यत्यय आला, ज्यामुळे मेस्सीला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.

टायगर श्रॉफला स्टेजवर आला, त्याने देवेंद्र फडणवीस आणि मेस्सी यांची भेट घेतली. तेव्हा टायगरला 'युवा आयकॉन' म्हटले तेवढ्यात स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लोकांमधून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. काही क्षणांनंतर, जेव्हा अजय देवगण स्टेजवर आला तेव्हा गर्दीने पुन्हा ओरडओरडा केला. यातून स्पष्ट प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत होती. कारण प्रेक्षक बॉलिवूड स्टार्ससाठी नाही तर लिओनेल मेस्सीसाठी जमले होते. मात्र त्याची झलक काही मिनिटांसाठीच पाहायला मिळाली.

अजय देवगण आणि टायगर श्रॉफचे हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, "वानखेडे स्टेडियमवरील चाहते बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आले नव्हते... ते मेस्सी आणि खेळांसाठी आले होते..." दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, "देवेंद्र फडणवीस यांनी लिओनेल मेस्सी, सुआरेझ आणि रॉड्रिगो यांच्यासमोर अजय देवगण आणि टायगर श्रॉफचा सन्मान केला. हे पूर्णपणे चुकीचे आहे."

Lionel Messi - Wankhede Stadium Mumbai
Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 : 'रणवीर सिंह'नं केलं 'कपिल शर्मा'ला धोबीपछाड, पहिल्या दिवशी 'किस किसको प्यार करू 2' ने कमावले फक्त 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com