Anupam Kher Took Blessing Of Look Shiva: अनुपम खेर भिमाशंकर मंदिरात दर्शनाला; शिवलिंगावर जलाभिषेक करत केली प्रार्थना...

रविवारी अनुपम खेर भीमाशंकर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शंकराच्या मंदिरात शिवलिंगावर शिवजलाभिषेक करत दर्शन घेतलं.
Anupam Kher Took Blessing Of Look Shiva
Anupam Kher Took Blessing Of Look ShivaSaam Tv

Anupam Kher Visited Bhima Shankar: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपुर्वी अनुपम खेर परदेशात सफर करत होते. त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. परदेशवारी केल्यानंतर त्यांनी नुकतेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला अभिनेता अनुपम खेर यांनी शिवलिंगावर शिवजलाभिषेक करत दर्शन घेतलं. (Bollywood Film)

Anupam Kher Took Blessing Of Look Shiva
Abhishek Bachchan Tweet: ऐश्वर्याच्या चाहत्याने अभिषेकला दिला 'हा' सल्ला, अभिनेता संतापला, म्हणाला...

अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. रविवारी अर्थात ३० एप्रिल रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानी जात अभिनेता अनुपम खेर यांनी शिवलिंगावर शिवजलाभिषेक करत दर्शन घेतलं. यावेळी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे होत असलेल्या कॉरिडॉर, मंदिर परिसराच्या विकास कामांची पहाणी सुद्धा त्यांनी केली. दरम्यान भिमाशंकर देवस्थानकडुन खेर यांना सन्मानित देखील करण्यात आले. (Entertainment News)

Anupam Kher Took Blessing Of Look Shiva
TRP Rating: 'आई कुठे काय करते' मालिकेला मागे टाकत स्टार प्रवाहवरील या मालिकेने मारली बाजी

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अनुपम खेर एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून कोलकात्याला गेले होते. भाजपचा कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुपम खेर यांनी कोलकाता येथे आगमन झाल्यावर कालीघाट मंदिराला भेट दिली आणि माँ कालीचे दर्शन देखील घेतले. कालीघाट मंदिर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळ असलेल्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले होते. (Bollywood Actor)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com