Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात तुफान राडा, कोकण हार्टेड गर्ल अभिजीतवर संतापली; नेमकी कोणी टाकली ठिणगी?

Abhijeet - Ankita Fight : 'बिग बॉस मराठी' च्या घरात आता नवीन राडा पाहायला मिळत आहे. अभिजीत आणि अंकितामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे.
Abhijeet - Ankita Fight
Bigg Boss MarathiSAAM TV
Published On

'बिग बॉस मराठी' चा (Bigg Boss Marathi ) खेळ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादा घरातून बाहेर झाले आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना फार वाईट वाटले आहे. गेले अनेक दिवस घरात शांती आणि मनोरंजनाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. मात्र आता पुन्हा एकदा घरातील सदस्यांमध्ये वाद झालेले पाहायला मिळत आहेत.

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिता आणि अभिजीत यांच्यात मोठे कडाक्याचे भांडण झालेले पाहायला मिळत आहे. घरातील कामांवरून अभिजीत आणि अंकितामध्ये भांडण होताना पाहायला मिळत आहे. अंकिता (Ankita walawalkar) अभिजीत म्हणते की, "तिला डायनिंग टेबल देऊन तू सर्व स्वतःवर घेतोयस" यावर अभिजीत बोलतो की, "तुला जर वाटतंय की तुझ्या ड्युटीज जास्त आहेत तर तू डायरेक्ट तिला बोल ना" यावर अंकिताचा आवाज चढतो आणि ती त्याला बोलते की, "सगळीकडे तू जेंटलमन बनून येतोस, तर ये ना इथेही जेंटलमन बनून" यावर अभिजीत (Abhijeet sawant ) बोलतो की, "माझी ड्युटी माझ्या सोयीप्रमाणे घेतली, यात मी चुकीचा काय आहे?" या सर्व भांडणांचे मूळ कारण निक्की ठरली आहे.

हा बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा आहे. कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. या शोचा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर पार पडणार आहे. आता घरातून कोण बाहेर पडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Abhijeet - Ankita Fight
Arbaz Patel- Nikki Tamboli: निक्कीला प्रपोज करणार का? त्या प्रश्नावर अरबाजने स्पष्टचं सांगितलं, म्हणाला 'जर तिला हे नातं...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com