FIR Against Honey Singh: हनी सिंगच्या अडचणी वाढणार; रॅपरवर अपहरणाचा धक्कादायक आरोप

Yo Yo Honey Singh Is In Trouble: हनी सिंग विरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
FIR file against Honey Singh
FIR file against Honey Singh Saam TV
Published On

An Event Company Owner Files FIR Against Honey Singh: रॅपर आणि सिंगर हनी सिंग सध्या त्याच्या नव्या अल्बममुळे चर्चेत होता. परंतु आता हनी सिंग अडचणीत सापडला आहे. हनी सिंग विरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका इव्हेंट कंपनीच्या मालकाने केली आहे. तसेच त्याने हनी सिंगवर गंभीर आरोप केले आहेत.

विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंग आणि इतर काही व्यक्तींविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. विवेक रमन हे एका इव्हेंट कंपनीचे मालक आहेत. (Latest Entertainment News)

FIR file against Honey Singh
Kanguva Teaser OUT: साऊथ सुपरस्टार सूर्याचा ४२ वा चित्रपट; 'कांगुवा'चा टीझर पाहून येईल अंगावर काटा

त्यांनी यो यो हनी सिंग आणि त्याच्याशी संबंधित काही व्यक्तींविरोधात अपहरण करून त्यांना बंदिस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना मारहाण केल्याची देखील तक्रार विवेक रमन यांनी दाखल केली आहे.

हनी सिंग नुकताच त्याच्या ब्रेकअप मधून सावरला आहे. त्याच्या ब्रेकअपचा परिणाम त्याच्या म्युजिक व्हिडिओवर झाला. त्यामुळे त्याचा अल्बम ३ महिने उशिरा प्रदर्शित झाला आहे.

हनी सिंगने विरोधात नागपूर न्यायालयात खटला सुरु आहे. अश्लील नृत्य आणि गीते सादर केल्या प्रकरणी नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये 2015 साली तक्रार दाखल करण्यात आली होती. 2014 ला अश्लील गाणं युट्युबवरती अपलोड केल्याप्रकरणी त्याच्यावर ती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच गाण्याचं आज सॅम्पल घेण्यात आले.

सप्टेंबर २०२२ ला हनी सिंगचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तो पुन्हा नव्या नात्यात आला होता. हनी सिंगने दिल्लीतील एका कार्यक्रमात टीना थडानीला डेट करत असल्याची घोषणा केली आहे. हनी सिंगने काही महिन्यांपूर्वी पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com