Kanguva Teaser OUT: साऊथ सुपरस्टार सूर्याचा ४२ वा चित्रपट; 'कांगुवा'चा टीझर पाहून येईल अंगावर काटा

Suriya 42th Movie: गेल्या वर्षांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सूर्याच्या चित्रपटाचे नाव 'कांगुवा' असे आहे.
Kanguva Teaser Out
Kanguva Teaser OutSaam TV
Published On

Suriya's film Titled Kanguva: सुपरस्टार सूर्याच्या 42 व्या चित्रपटाची 2022 पासून जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नव्हते. पण आता स्टुडिओ ग्रीनने या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली असून, त्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहते सुर्याच्या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत.

गेल्या वर्षांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सूर्याच्या चित्रपटाचे नाव 'कांगुवा' असे आहे. अग्नीच्या सामर्थ्याने मनुष्याला चिन्हांकित करणारा, 'कंगुवा' चित्रपट एका पराक्रमी शूर नायकाची कथा आहे. या चित्रपटामध्ये दिशा पटानी, योगी बाबू मुख्य भूमिकेत आहेत. शिवा यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शिन केले आहे. हा चित्रपट 10 भाषांमध्ये आणि 3D मध्ये बनवला जात आहे.

Kanguva Teaser Out
Aaradhya Bachchan Case: अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनने दिल्ली हायकोर्टात दाखल केली याचिका, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

चित्रपटाच्या टीझरची सुरूवात घोड्याच्या किंकाळीने होता आहे. त्यानंतर गरुड, श्वान आणि एक योद्धा दिसत आहेत. त्या योध्याच्यामागे त्याची मोठी आहे. या व्यतिरिक्त टीझरमध्ये विविध प्रांण्यांचे आवाज ऐकू येत आहेत. हे सर्व दिसताना खूप भयंकर दिसत आहे. त्यामुळे सूर्याच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असणार. (Latest Entertainment News)

सुपरस्टार सुर्या कांगुआमधील या मास एंटरटेनरमध्ये वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहे, जो देशभरातील सर्व प्रकारच्या प्रेक्षकांशी नक्कीच कनेक्ट होईल. या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल बोलताना दिग्दर्शक शिवा म्हणाले की, 'आम्हाला सूर्याचा 42 वा चित्रपटाचे नाव 'कांगुवा' म्हणून घोषित करताना खूप आनंद होत आहे.

ज्याच्याकडे अग्निची शक्ती आहे. हे सूर्याने पडद्यावर उत्कृष्टपणे चित्रित केले आहे, हा चित्रपट भव्य, अद्वितीय आणि सिनेप्रेमींसाठी एक मनोरंजक अनुभव असेल. आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच रिलीजची तारीख जाहीर करू."

गोवा, चेन्नई आणि इतर अनेक ठिकाणी या चित्रपटाचे ५० टक्के शूटिंग पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण केले जाणार आहे.

चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शन खूप मोठे असणार आहे. कारण त्यात बरेच अॅक्शन सीक्वेन्स आणि अॅडव्हान्स VFX आणि CGI यांचा समावेश आहे. तर निर्माते 2024 च्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com