Amitabh Bachchan : ५० लाखांचे स्पीकर, ३० डिझायनर पेन...दिग्दर्शकाने सांगितलं किती आलिशान आहे अमिताभ बच्चन यांचा जलसा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा 'कांटे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले होते. अलीकडेच संजय गुप्ता यांनी पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्यात गेल्यावर त्यांचा अनुभव कसा होता हे सांगितले.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Saam Digital
Published On

Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटांसह त्यांच्या लग्झरी स्टाइलसाठी ओळखले जातात. ते कोणत्या शोमध्ये आले किंवा कुठे गेले तरी आपल्या खास स्टाईलने लोकांची मने जिंकतात. त्यांच्यासह त्यांचा बांगला जलसाही खूप चर्चेत आहे. समोर हा बांगला अत्यंत आलिशान वाटतो. पण आतून त्याची झलक पाहण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. चित्रपट दिग्दर्शक संजय गुप्ता यांना अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर जाऊन त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांचा अनुभव कसा होता, याचा खुलासा त्यांनी नुकताच केला आहे.

संजय दत्तने बिग बींची भेट निश्चित केली

एका पॉडकास्टवर खुलासा करताना दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन हे कांटे या चित्रपटासाठी त्यांची पहिली पसंती नव्हते. या चित्रपटासाठी त्यांना नसीरुद्दीन शाह यांना नवीन लोकांसह कास्ट करायचे होते. पण जेव्हा त्यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट संजय दत्तला सांगितली तेव्हा संजय दत्तने त्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि नंतर संजयने या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना घेण्याचे सुचवले. संजय गुप्ता यांनी सुरुवातीला संजय दत्तची ही कल्पना नाकारली, पण जेव्हा संजय गुप्ता संजय दत्तच्या घरी होते तेव्हा त्यांनी बिग बींसोबत दिग्दर्शकाची भेट निश्चित केली.

Amitabh Bachchan
Prabhas Injured : आता मला ही मोठी संधी सोडावी लागेल... ; 'फौजी'च्या सेटवर प्रभास जखमी, मागितली चाहत्यांची माफी !

मी घाबरून जलसाला पोहोचलो

संजय गुप्ता म्हणाले, “त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता भेटायचे निश्चित केली. मी खूप घाबरलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर पोहोचलो. तेवढ्यात दोन गार्ड धावत आले आणि मला गाडी पार्क करायला सांगितली. त्याने मला आत जाण्याची सूचना केली. मी त्यांच्या घरी गेलो आणि पायऱ्या चढलो, तिथे मला अमिताभ बच्चन यांचे कृष्णधवल चित्र दिसले. पण जेव्हा मी दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो तेव्हा मला खूप लहान वाटू लागते.”

Amitabh Bachchan
Sonakshi Sinha : 'पुढे काही बोलण्यापूर्वी...', मुकेश खन्ना यांच्या विधानावर सोनाक्षीने सुनावले खडे बोल...

अमिताभ बच्चन यांचे घर आतून असे दिसते

संजय गुप्ता पुढे म्हणाले, “यानंतर ते मला एका आलिशान खोलीत घेऊन गेले, जिथे माझ्यासाठी चहा आणि नाश्ता मागवण्यात आला. तेवढ्यात अचानक मागून दरवाजा उघडला आणि पांढरा पठाणी घातलेला एक उंच माणूस बाहेर आला. यानंतर त्यांनी माझी ओळख करून दिली आणि मग ते मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले आणि म्हणाले मी पाच मिनिटात येतो. मला माहित होते की बिग बी अतिशय हायटेक साउंड सिस्टम वापरतात. तर तेथे असलेले एक स्पीकर आणि साउंड सिस्टीमच सुमारे ५० ते ६० लाख रुपये किंमतीचे होते. तसेच एका डेस्कवर २५ ते ३० पेन होते. ते सर्व पेन मॉन्ट ब्लॅकच्या डिझायनर एशियन पेन होते. मी हे सगळं पाहतच होतो तेवढयात बिग बी आले आणि आम्ही कथन सुरू केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com