Jaya Bachchan: जया बच्चन यांना पापाराझी का आवडत नाहीत? मुलगी श्वेता बच्चनने सांगितलं खरं कारण

Jaya Bachchan News: अनेक वेळा जया बच्चन पापाराझींवर रागावताना दिसतात. पण, यामागे नेमके कारण काय हे त्यांची मुलगी श्वेता बच्चनने सांगितले आहे.
Jaya Bachchan and shweta Bachchan
Jaya Bachchan and shweta Bachchan Saam Tv
Published On

Jaya Bachchan : कधी विमानतळाबाहेर तर कधी जिमबाहेर, पापाराझी स्टार्सचे फोटो क्लिक करताना आणि व्हिडिओ बनवताना दिसतात. असे अनेक वेळा पाहिले गेले आहे की जेव्हा एखादा पापाराझी जया बच्चन यांचे फोटो सार्वजनिक ठिकाणी क्लिक करतो तेव्हा त्यांना राग येतो. अनेकदा त्यांचे सोशल मीडियावर पापाराझींवर रागावतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एकदा जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनने गर्दी पाहून आई जया बच्चन का रागावतात हे सांगितले होते. श्वेता आणि अभिषेक बच्चन दोघेही करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये एकत्र दिसले. यादरम्यान, करणने जया बच्चनच्या अशा व्हिडिओंवर दोघांची प्रतिक्रिया विचारली होती.

Jaya Bachchan and shweta Bachchan
Priya Prakash Varrier: 'गुड बॅड अग्ली'च्या प्रदर्शनानंत प्रिया प्रकाशने लिहिली अजित कुमारसाठी खास पोस्ट; म्हणाली,'शूटिंगच्या...'

अभिषेक आणि श्वेता बच्चन काय म्हणाले?

यावर प्रतिक्रिया देताना अभिषेक बच्चनने गमतीने म्हटले की, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण शांतपणे प्रार्थना करतो की तिथे पापाराझी नसावेत. श्वेता पुढे म्हणाली की जेव्हा तिच्या आईभोवती खूप लोक असतात तेव्हा तिला क्लॉस्ट्रोफोबिक वाटते. गर्दी पाहून तिला अचानक थोडी काळजी वाटते. श्वेताने असेही म्हटले की तिच्या आईलाही कोणीही तिला न विचारता तिचे फोटो काढणे आवडत नाही. त्या वेळी श्वेता बच्चनने असेही म्हटले होते की तिच्या आईला गर्दीच्या ठिकाणी जाणे आवडत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा पापाराझींना ती कुठेतरी दिसते आणि ते तिच्या मागे लागले, तेव्हा ती अस्वस्थ होते आणि रागावू लागते.

Jaya Bachchan and shweta Bachchan
Bhool Chuk Maaf: 'आज 29 है या 30?'; टाईम लूपमध्ये अडकली राजकुमार राव आणि वामिका गब्बीची अजब लव्हस्टोरी

या चित्रपटातून केली कारकिर्दीची सुरुवात

जया बच्चन गेल्या ६ दशकांपासून चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत. त्यांनी १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महानगर' या बंगाली चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुड्डी' या चित्रपटात ती पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com