मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोचे शूटिंग देखील थांबवले होते. महानायकानं दिलेली ही माहिती वाचून चाहतेही चिंतेत होते. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत होते. तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे. स्वत: बच्चन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मी आता शूटिंगला देखील सुरूवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Amitabh Bachchan Corona News)
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अपडेट देत असतात. आता देखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. २४ ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी मी कामावर परतलो आहे. सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल आभार मानले आहेत. त्यांचा कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ९ दिवसांचा आयसोलेशन कालावधी संपला आहे. मात्र ७ दिवस खबरदारी म्हणून वेगळे राहणे बंधनकारक आहे. चाहत्यांनी केलेल्या या प्रार्थनेमुळे हे शक्य आहे, असेच तुमचे प्रेम कायम असूद्या, असे ते म्हणाले. (Amitabh Bachchan Todays News)
सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा १४ वा सीझन होस्ट करत आहेत. सेटवर शूटिंग करताना अमिताभ बच्चन खूप खबरदारी घेत होते. 'कौन बनेगा करोडपती' शोच्या सेटवर अमिताभ क्रू मेंबर्स व्यतिरिक्त अनेक स्पर्धकांच्या संपर्कात येतात. परंतु या दरम्यान संपूर्ण काळजीही घेतली जाते आणि कोविड प्रोटोकॉल देखील पाळला जातो. मात्र, अद्यापही अमिताभ यांना कोरोना कसा झाला याबाबत माहिती मिळालेली नाही.
बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिअॅलिटी टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' च्या १४ व्या सीझनचे होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर, नागार्जुन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन हे रश्मिका मंदान्नासोबत 'गुडबाय' आणि 'प्रभास' आणि क्रिती सेननसोबत 'प्रोजेक्ट के' मध्ये दिसणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.