ऐकावं ते नवलच! दिशासोबतच नुकताच ब्रेकअप; लगेच दुसरीच्या प्रेमात पडला टायगर श्रॉफ?

टायगर श्राफ कॉफी विथ करणच्या आगामी भागामध्ये क्रिती सेननसोबत वेगळ्या आणि मजेदार शैलीत दिसणार आहे.
Tiger Shroff
Tiger Shroff Saam Tv
Published On

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ(Tiger Shroff) त्याच्या अॅक्शन सीन्ससह रूपेरी पडद्यावर दमदार भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याच्या आयुष्यात तो खूप शांत आणि मनमिळावू आहे. अलीकडेच, अभिषेक बच्चनने टायगर श्रॉफ खूप शांत असल्याचे सांगितले होते. आता टायगर श्राफ कॉफी विथ करणच्या आगामी भागामध्ये क्रिती सेननसोबत वेगळ्या आणि मजेदार शैलीत दिसणार आहे. यावेळी त्याने रंजक खुलासा केला आहे, ज्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

Tiger Shroff
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव २१ दिवसांपासून रुग्णालयात, नातेवाइकांनी दिली हेल्थ अपडेट

प्रसिद्ध दिग्दर्शक - निर्माता करण जोहरच्या(Karan Johar) कॉफी विथ करण या लोकप्रिय चॅट शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. यावेळी ते त्यांच्या 'पर्सनल टू प्रोफेशनल' लाईफबाबत अनेक मजेदार खुलासे करतात. आगामी ९व्या एपिसोडमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननची जोडी दिसणार आहे. यावेळी त्याने काही रंजक खुलासा केला. ज्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसणार आहे. विशेष म्हणजे शोमध्ये टायगरने दिशाऐवजी 'श्रद्धा कपूर'चे नाव घेतले आहे.

Tiger Shroff
एका मुलीच्या प्रेमात राजकुमार रावने केलं असं काही... ऐकून धक्काच बसेल!

कॉफी विथ् करणच्या आगामी भागामध्ये ,टायगर श्रॉफला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने हटके स्टाईलमध्ये त्याच्या सध्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे. सध्या तरी मी सिंगल असून प्रेमाच्या शोधात असल्याचं त्याने सांगितले आहे. पण जिच्यावर त्याचं प्रेम आहे, त्या अभिनेत्रीचं नावही सांगून टाकलं. ती अभिनेत्री दिशा पाटनी नसून श्रद्धा कपूर आहे. टायगर म्हणाला, “मला लहानपणापासूनच श्रद्धा कपूर आवडायची. ती खूप छान आहे! ” आता टायगरच्या या वक्तव्यानंतर टायगर-दिशाचे चाहतेदेखील नाराज झाले आहेत.

आगामी एपिसोड्समध्ये टायगर त्याच्या चाहत्यांना धक्का देणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल. टायगर श्रद्धा कपूरसोबत 'बागी' चित्रपटात आणि दिशा पाटनीसोबत 'बागी 2'मध्ये दिसला होता. टायगर त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत पुन्हा दिसणार आहे. कॉफी विथ् करण ७ चा हा आगामी एपिसोड गुरूवारी दुपारी १२ वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com