Salim Khan: सलीम खान यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले अमिताभ बच्चन अन् जावेद अख्तर; व्हायरल फोटोचं नेमकं सत्य काय?

Salim Khan Health Update: सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी रुग्णालयात जात आहेत. दरम्यान, एक फोटो व्हायरल होत आहे अमिताभ बच्चन आणि जावेद अख्तर सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येत आहेत.
Salim Khan Health Update
Salim Khan Health UpdateSaam TV
Published On

Salim Khan Health Update: सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध बॉलीवूड लेखक सलीम-जावेद यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना बघण्यासाठी अनेक कलाकार रुग्णालयात आले होते. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे यामध्ये त्यांचे मित्र आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दोनदा लीलावती रुग्णालयात त्यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत..

अलीकडेच, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये सलीम खान हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. जावेद अख्तर आणि अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्यासमोर दिसत आहेत. असे दिसते की ते सलीम खानच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. पण, मीडिया किंवा बॉलिवूडशी संबंधित कोणालाही याची माहिती नाही. या फोटोमागील सत्य काय आहे? जाणून घ्या.

Salim Khan Health Update
Actress Father Died: अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची हत्या; घरात शिरून संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

अमिताभ बच्चन आणि जावेद अख्तर सलीम खानच्या समोर बसलेले दिसले

सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये लिहिले होते, "एक जोडी पूर्ण, दुसरी अपूर्ण." जावेद अख्तर आणि अमिताभ बच्चन सलीम खानच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले. परंतु धरमजी त्यांच्यात नाही. 'शोले' चित्रपटासाठी जय-वीरूची अजरामर पात्रे निर्माण लिहीणीरी ही सलीम-जावेद जोडी होती. फोटोमध्ये सलीम खान हॉस्पिटलच्या बेडवर हसत बसलेले आहेत आणि अमिताभ बच्चन आणि जावेद अख्तर समोरासमोर बसलेले आहेत. पण हा फोटो खरा नाही.

Salim Khan Health Update
Kriti Sanon: करोडपती बिजनेसमॅनचा हात धरुन लंडनच्या रस्त्यांवर फिरते क्रिती सॅनन, अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

फोटोमागील संपूर्ण सत्य काय आहे?

हा व्हायरल फोटो एआयने तयार केलेला दिसतो. खरं तर, बारकाईने पाहिल्यावर, अमिताभ बच्चन, जावेद अख्तर आणि सलीम खान यांचे चेहरे त्यांच्या वास्तविक वयाशी जुळत नाहीत. शिवाय, फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि जावेद अख्तर यांनी स्नीकर्स आणि स्पोर्ट्स शूज घातले आहेत. रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णाला भेटण्याची परवानगी नाही. म्हणून, हा फोटो पूर्णपणे बनावट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com