Anushka And Amitabh Bachchan Riding: विना हेल्मेट रायडिंग करणं बिग बींना आणि अनुष्काला भोवलं; मुंबई पोलिसांची कायदेशीर कारवाई

Mumbai Police Takes Action: दोघांनीही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने आता मुंबई पोलिस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत.
Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding Mumbai Police Takes Note
Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding Mumbai Police Takes NoteInstagram

Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding: मुंबईची वाहतूक कोंडी जशी सर्वसामान्यांना भेडसावते तशीच सेलिब्रिटींनाही भेडसावते. अनेकदा सेलिब्रिटींना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. असाच प्रकार काल मुंबईत आपण पाहिला.

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी काल शूटिंगसाठी लेट होत असल्यानं थेट दुचाकीचा वापर करत शूटिंग स्पॉट गाठलं. यामुळेच ते अडचणीत आले आहेत. दोघांनीही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने आता मुंबई पोलिस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत.

दोघांचेही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव आणि ट्रोलिंग एकत्र होत आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, चला तर जाणून घेऊया....

Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding Mumbai Police Takes Note
Shah Rukh Khan Launches Gauri Khan's Book: मन्नत कसं घडलं? बायको गौरीच्या बुक लाँचच्या वेळी शाहरुखने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

खरं तर, अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा शूटिंग स्पॉटवर पोहोचण्यासाठी आलिशान कारऐवजी बाईकवर शूटिंगला जाताना दिसले. दोघांनाही मुंबईच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं असल्याने, त्यांनी थेट बाईकवरून प्रवास करण्याचं ठरवलं. काल सकाळी बिग बी बाईकवरुन जाताना दिसल्यानंतर, अनुष्कानेही गाडीचा वापर न करता शूटिंगला बाईकवरुन जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांनी ही हेल्मेट न घातल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेत मुंबई पोलिसांना टॅग करून सामान्य नागरिकांप्रमाणे यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding Mumbai Police Takes Note
Adah Sharma On The Kerala Story: केरला स्टोरीला यश मिळालं तरी अदा असं का म्हणतेय, ‘हा माझा शेवटचा चित्रपट असेल?’

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत मुंबई पोलिस म्हणाले, “आम्ही हे सर्व फोटो वाहतूक पोलिस शाखेसोबतच शेअर केले आहेत.” बिग बींनी चाहत्याच्या गाडीवर फोटो काढत सोशल मीडियावर शेअर केला होता, सोबतच त्यांनी त्याचे त्यान आभार देखील मानले होते.

बिग बींनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “धन्यवाद मित्रा बाईक राईडसाठी. तुला माहित नाही, पण तू मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलेस. मला कधीही न संपणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाचवल्याबद्दल धन्यावाद.”

तर अनुष्का शर्माबद्दल बोलायचे झाले तर, तिला पापाराझींनी बाईकवरुन जाताना स्पॉट केले होते. ती देखील विना हेल्मेट दुचाकीवर बसली होती. अशा परिस्थितीत या दोघांनाही वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवरील ‘काला’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या महिन्यात ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील दिसणार आहे. सोबतच, अनुष्का सध्या ‘चकडा एक्सप्रेस’मधून पुनरागमन करणार आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित चित्रपटाची कथा क्रिकेटर झुलन गोस्वामीवर चित्रित करण्यात आली आहे.

Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding Mumbai Police Takes Note
Anushka Sharma Bike Ride Video: अनुष्काची बॉडीगार्डसोबत बाईक राईड; Video पाहून नेटकऱ्यांनी चांगलंच झोडपलं

बिग बी यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, बिग बी सध्या नाग अश्विनच्या 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरही ते जखमी झाले होते. अलीकडेच त्यांनी रिभू दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित 'सेक्शन 84' मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com