'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' या गाण्यावरच्या रीलने अक्षरश: सर्वांना वेड लावलं आहे. या रीलमुळे रातोरात सुपरस्टार झालेल्या चिमुकल्या साईराज केंद्रेची (Sairaj Kendre) सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या व्हिडिओतील चिमुकल्या साईराजच्या एक्स्प्रेशनने तर साऱ्यांची मनं जिंकली आहेत. सध्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये साईराजचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
साईराजच्या या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांमध्येच ४२.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. त्यानंतर साईराजचे गोविंदावर आधारीत आणखी एक रील व्हायरल झाले होते. साईराज आता संपूर्ण महाराष्ट्राचाच लाडका झाला आहे. अशामध्ये या चिमुकल्या साईराजचं नशीब चमकलं आहे. साईराज लवकरच एका नव्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गायक आणि संगीतकार प्रवीण कोळी यांच्या आगामी 'देवबाप्पा' या गाण्यामध्ये चिमुकल्या साईराजला काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. या गाण्याचा प्रोमो व्हिडिओ साईराजच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत 'बाप्पाच्या आशीर्वादाने ... साईराजचं पहिलचं गाणं देवबाप्पा येत आहे.तर तुम्ही पहायला नक्की तयार रहा आणि या गाण्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद द्या...' असं कॅप्शन देण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये साईराज हातामध्ये लाडक्या गणपती बाप्पाला घेऊन येताना दिसत आहे. हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पोस्टवर साईराजच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये हार्ट इमोजी शेअर केले आहेत. साईराजच्या या पोस्टला अवघ्या दोन तासांमध्ये ६४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १४ हजारांपेक्षा अधिक जणांनी या व्हिडिओला लाइक्स केले आहे.
'आमच्या पप्पांनी गणपती आणला...' या एका रीलमुळे साईराजचं नशीब पालटलं आहे. साईराजला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. अवघ्या ४ वर्षांचा असलेला साईराज केंद्रे आज सर्वांच्या हृदयावर राज्य करत आहे. हा चिमुकला बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावातील रहिवासी आहे. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीमधील माऊली अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये साईराज शिकतो. साईराजने शाळेच्या गणवेशात व्हिडिओ शूट केल्यामुळे त्याच्या शाळेचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून साईराज हा स्टारच झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.