Allu Arjun: सलमान- शाहरुखचा रेकॉर्ड ब्रेक; अल्लू अर्जुन ठरला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

Allu Arjun Become highest paid actor: जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली आता अल्लू अर्जुनसोबत एक मेगा-बजेट 'पॅरलल युनिव्हर्स' असलेला 'ए६' चित्रपट बनवत आहेत आणि या चित्रपटाची सध्या जोरात तयारी सुरू आहे.
Allu Arjun Become highest paid actor
Allu Arjun Become highest paid actorSaam tv
Published On

Allu Arjun Become highest paid actor: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात खूप कमाई केली. आता, अल्लू अर्जुनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली आता अल्लू अर्जुनसोबत एक मेगा-बजेट 'पॅरलल युनिव्हर्स' असलेला 'ए६' हा चित्रपट बनवत आहेत आणि त्याची तयारी जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी खूप मोठी रक्कम घेतली आहे आणि यामुळे तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

अ‍ॅटलीच्या 'ए६' साठी अल्लू अर्जुनने आकारली मोठी रक्कम

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत त्याचा पुढचा चित्रपट करणार आहे. अल्लू अर्जुनने अ‍ॅटली अँड सन पिक्चर्ससोबत १७५ कोटी रुपयांचा करार केला आहे, तसेच नफ्यात १५ टक्के वाटा देण्याचा बॅकएंड करारही केला आहे. हा आतापर्यंत एखाद्या अभिनेत्याने केलेला सर्वात मोठा फ्रंट-एंड डील आहे आणि अल्लूने ऑगस्ट २०२५ पासून अ‍ॅटली अँड सन पिक्चर्ससाठी तारखा देखील बुक केल्या आहेत.

Allu Arjun Become highest paid actor
King Kohli IPL Memories: आयपीएलच्या उद्घाटनात अनुष्काचा डान्स पाहून विराट झाला घायाळ; व्हिडीओ पुन्हा व्हायरल

सलमान खानची फी

प्री-प्रॉडक्शनसाठी लागणाऱ्या वेळेनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान चित्रीकरण सुरू करण्याचा विचार आहे. VFX वर आधारित 'ए६' हा चित्रपट बनवण्याची चर्चा सुरु आहे. अभिनेता सलमान खान एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपयांचे मानधन घेतो.

Allu Arjun Become highest paid actor
Kiara Advani: दीपिका-प्रियंका नंतर, कियारा अडवाणी बनली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; ३०० कोटींच्या चित्रपटासाठी घेतली मोठी रक्कम

पुष्पा २ ची कमाई

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी तब्बल १७५.१ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या जोडीने सर्वांचे मन जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com