Deepika Padukone: दीपिकाला आणखी एक धक्का; दोन चित्रपटांमधून पत्ता कट्ट झाल्यानंतर तिसऱ्या चित्रपटात होणार 'हा' मोठा बदल

Deepika Padukone: दीपिका पदुकोण संदीप रेड्डी वांगासोबत तिच्या ८ तासांच्या शिफ्टवरून मतभेद झाले. दुसरीकडे,अभिनेत्रीने "कल्की २८९८ एडी" च्या सिक्वेलमधूनही काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही चित्रपट तिच्या पुढील प्रोजेक्टसाठी आता धोका होत चालले आहेत.
 Deepika Padukone
Deepika Padukone Saam Tv
Published On

Deepika Padukone: दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिला सातत्याने चित्रपटांच्या ऑफर्स मिळत राहतात. तिच्या चित्रपटांना चांगलेचं यश मिळते. त्यामुळे चित्रपट निर्माते तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतात. पण, दोन मोठे चित्रपट सोडल्यानंतर, दीपिका पदुकोण चर्चेत आहे. एकीकडे, तिचे संदीप रेड्डी वांगासोबत तिच्या ८ तासांच्या शिफ्टवरून मतभेद झाले. दुसरीकडे,अभिनेत्रीने "कल्की २८९८ एडी" च्या सिक्वेलसाठी तिची फी वाढवली ​​आहे, त्यानंतर निर्मात्यांनी तिला टीममधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही चित्रपट तिच्या पुढील प्रोजेक्टसाठी आता धोका होत चालले आहेत.

दीपिका पदुकोण सध्या पोलंडमध्ये आहे, जिथे शाहरुख खानच्या "किंग" चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अभिनेत्रीने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे यामध्ये ती बातमी शेअर करत आहे. हा चित्रपट पूर्ण केल्यानंतर, ती अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. वृत्तानुसार, तिने चित्रपटासाठी आधीच १०० दिवस दिले आहेत.

 Deepika Padukone
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची EOW करणार चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

या निर्णयाचा दीपिकाच्या करियरवर परिणाम होईल?

अलीकडेच एका न्यूज वेबसाइटने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता यामध्ये दीपिकाला दोन चित्रपटांमधून काढून टाकल्याने चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच धक्का बसल्याचे उघड झाले होते. टॉलिवूड चित्रपट निर्माते आणि दीपिका यांच्यात वाद झाला आहे. त्यामुळे अभिनेत्रीला स्पिरिटमधून काढून टाकण्यात आले. आता, कल्की २ सारख्या मोठ्या चित्रपटातून देखील ती बाहेर पडल्यानंतर, दीपिका पदुकोणबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोक सोशल मीडियावर तिला ट्रोल करत आहेत. असेही म्हटले जात आहे की रणवीर सिंगप्रमाणेच दीपिकालाही आता राग आनावर होत आहे.

 Deepika Padukone
A.R. Rahman: ए.आर. रहमान यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; चोरीचा आरोप फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

आता अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटलीच्या 'AA22xA6' या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असेल. यासाठी तिला साइन करण्यात आले आहे. पण, माहितीनुसार दीपिका मुख्य भूमिकेत असली तरी तिचा रोल कमी करण्याचा निर्णय निर्माते घेत आहेत. हा चित्रपट ८०० कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात आहे. जर असे झाले तर दीपिका पदुकोणचे मोठे नुकसान होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com