मुंबई: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट सध्या चर्चेमध्ये आले आहेत. या चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. तसेच शिवअष्टक या चित्रमालिकेत ४ पुष्प शेर शिवराज नावाचा चित्रपट (Movies) प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाला राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या (Mumbai) थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याची खंत अनेक सेलिब्रेटींनी व्यक्त केली आहे. (Marathi Movie News)
यामध्ये पावनखिंड तसेच छोट्या पडद्यावर असलेले लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस मराठी'मध्ये झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर (Social media) याविषयी एक पोस्ट शेयर केली आहे. त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपटाला प्राईम टाईम का मिळत नाही असा प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केला आहे. अक्षयने आपल्या फेसबूक (Facebook) पोस्टमध्ये देखील सांगितले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा मागील आठवड्यात प्रसिद्ध झाला होता .
हे देखील पाहा-
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्याच्या पाठीमागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा मोठा उद्देश होता की, महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा, नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक गोष्टी विषयी या चित्रपटांद्वारे मांडले गेले आहेत. यामध्ये मराठी जनतेने उत्स्फुर्त पणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आहे. आता सुद्धा महाराष्ट्रात जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असे म्हटले तरी चालेल, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स.
याअगोदर देखील मराठी चित्रपटांना प्राईम टाईम दिला जात नाही. यावरुन मोठा वाद झाला असल्याचे दिसून आला होता. मात्र, त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. आता परत एकदा हा प्रश्न ऐरणीवर आल्याने मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. अक्षयने त्याविषयी परखड प्रतिक्रिया दिली आहे की, सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो. यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मितीच्या मागे असंख्य हात लागले असतात. या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत. या सगळ्याचा विचार कोण करणार? आपल्या राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असणार असेल तर या विषयी आवाज उठवायला नको का? जी व्यवस्था हे सगळे बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही?
नाहीतर, यापुढे मराठी चित्रपट निर्मिती करत असताना निर्माते देखील १० वेळा विचार करणार आहेत आणि अनेक लोक बेरोजगार होणार आहेत. मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टीत निर्माण केली आणि या राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असणार आहे तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये होते आहे, तर इतर चित्रपटांविषयी काय बोलणार? बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रामध्ये झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...या शब्दांत अक्षयने आपला राग व्यक्त केला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.