पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज देखील पेट्रोल-(petrol) डिझेलच्या भावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam Tv
Published On

वृत्तसंस्था: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल- (petrol) डिझेलचे आजचे नवे भाव जारी करण्यात आला आहेत. सकाळी ६ वाजता लागू करण्यात आलेल्या पेट्रोल- डिझेलच्या नव्या भावानुसार, आज देखील पेट्रोल-(petrol) डिझेलच्या भावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. देशात सर्वच शहरांत आज पेट्रोल-डिझेलचे (Diesel) भाव स्थिर आहेत. मागील अनेक दिवसांपासून देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानीत १ लिटर पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये असून डिझेल ९६.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये १ लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये, तर १ लिटर डिझेलकरिता १०४.७७ रुपये मोजावे लागत आहेत. (Petrol Diesel Price Today)

हे देखील पाहा-

इंडियन ऑईलने जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात परभणीत पेट्रोलचे भाव १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत (Delhi) पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झाले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाच्या किंमतीत परत एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Petrol Diesel Price Today
हत्या करायची आणि आत्महत्या दाखवायची, शवविच्छेदनामुळे ५ खून उघडकीस

मुख्यमंत्र्याच्या बैठकीत, पीएम मोदी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भाववाढीचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. राज्यांना देखील त्यांचे कर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही राज्यांनी कर कमी केला आहे. परंतु, काही राज्यांनी त्याचा लाभ नागरिकांना दिला नाही. यावेळी पीएम मोदींनी त्या राज्यांची नावे देखील सांगितली आहे, ज्यांनी करात कपात केली नाही. ज्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड आणि केरळची नावे घेण्यात आले. पंतप्रधानांनी या राज्यात तेलाच्या भावाचाही उल्लेख केला आणि आता ही राज्ये जनतेला दिलासा देण्याचे काम करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

देशामधील महत्त्वाच्या शहरात भाव काय?

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई १२०.५१ १०४.७७

दिल्ली १०५.४१ ९६.६७

चेन्नई ११०.८५ १००.९४

कोलकाता ११५.१२ ९९.८३

हैद्राबाद ११९.४९ १०५.४९

कोलकाता ११५.१२ ९६.८३

बंगळुरू १११.०९ ९४.७९

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com