Akshay Kumar: 'हाऊसफुल ५' साठी अक्षय कुमारने किती फी घेतली? प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'इनकम टॅक्सची रेड...'

Akshay Kumar: अक्षय कुमार हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो. अलीकडेच, 'हाऊसफुल ५' च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये जेव्हा त्याला त्याच्या फीबद्दल विचारण्यात आले होते.
akshay kumar
akshay kumarSaam Tv
Published On

Akshay Kumar: अक्षय कुमार हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो. अलीकडेच, 'हाऊसफुल ५' च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये जेव्हा त्याला त्याच्या फीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने असे उत्तर दिले ज्यामुळे सगळेच खसू लागले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने अक्षयला 'हाउसफुल 5' साठी त्याची फी किती आहे, असे विचारले. त्यावर अक्षयने हसत हसत उत्तर दिले, "तुला रेड टाकायची आहे का?" अक्षयच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि त्याच्या विनोदी स्वभावाने सगळे खूश झाले.

akshay kumar
Bhool Chuk Maaf VS Kesari Veer: बॉक्स ऑफिसवर 'भूल चूक माफ'चा जलवा कायम; 'केसरी वीर' आणि 'कंपकंपी'ला मोठा झटका

अक्षयने पुढे सांगितले की, त्याने 'हाउसफुल 5' साठी चांगली फी घेतली आहे आणि चित्रपटदेखील मोठ्या बजेटमध्ये बनवला आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलताना त्याने सांगितले की, "आजचा दिवस आनंदाचा आहे, पण तुला रेड टाकायची आहे का?" अक्षयच्या या उत्तराने त्याच्या विनोदी आणि बेधडक स्वभावाचे पुन्हा एकदा प्रदर्शन केले.

akshay kumar
Deepika Padukone: 'मी माझ्या निर्णयांवर ठाम...; 'स्पिरिट' चित्रपटाच्या वादावर दीपिका पदुकोण स्पष्टच बोलली

'हाउसफुल 5' हा एक मल्टी-स्टारर चित्रपट आहे, यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, जैकलीन फर्नांडीस, नाना पाटेकर, चंकी पांडे, डिनो मोरिया आणि इतर अनेक कलाकार आहेत. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com