Dhamaal 4
Dhamaal 4Saam TV

Dhamaal 4: आदी- मानवाची जोडी लवकरच करणार 'धमाल 4'; अजय देवगणने शेअर केले सेटवरील आनंदाचे क्षण

Dhamaal 4 Movie: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने 'धमाल' फ्रँचायझीच्या चौथ्या भागाच्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर सेटवरील काही आनंददायी क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
Published on

Dhamaal 4: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने 'धमाल' फ्रँचायझीच्या चौथ्या भागाच्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर सेटवरील काही आनंददायी क्षणांचे फोटो शेअर केले, यामध्ये दिग्दर्शक इंद्र कुमार, अभिनेता रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, संजीदा शेख आणि अंजली आनंद यांचा समावेश आहे. या फोटोंमध्ये संपूर्ण टीम मालशेज घाटातील शूटिंगनंतर आनंदी दिसत आहे.

अजय देवगणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मॅडनेस परत आला आहे! #Dhamaal4 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. मालशेज घाटातील शेड्यूल पूर्ण झाले असून, आता मुंबईतील शेड्यूल सुरू होत आहे! हसण्याचा महापूर लवकरच येणार!" या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे, परंतु काहींनी आशिष चौधरी आणि बोमन इराणी यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारणा केली आहे.

Dhamaal 4
Gulkand: ‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा नवा 'गुलकंद'!

'धमाल' फ्रँचायझीच्या या नव्या भागात अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांची प्रमुख भूमिका आहे. माधुरी दीक्षितबद्दल अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. ​

Dhamaal 4
Phule movie controversy: 'फुले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणांमुळे प्रदर्शनाची लांबणीवर

अजय देवगण सध्या 'धमाल 4' च्या शूटिंगसोबतच 'रेड 2' च्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे, हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'धमाल 4' च्या शूटिंगनंतरच्या या आनंददायी फोटोंमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com