मुंबई: अजय देवगण Ajay Devgan तान्हाजी द अनसंग वॉरिअर सुपरहिट झाल्यानंतर आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ आहे. १९७१ रोजी भारताने युद्धात पाकिस्तानवर कसा विजय मिळवला याची स्टोरी या चित्रपटात दाखवली जाणार होती. हा चित्रपट आज १३ ऑगस्ट रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला आहे.
कसा आणि कुठे पाहाल चित्रपट?
खरं तर ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२० रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोना संक्रमणामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर गेले. आता चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारवर ऑनलाईन प्रदर्शित झाला आहे. आज १३ ऑगस्टपासून तो ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सशुल्क सबस्क्रिप्शनसह ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट एचडीमध्ये डाऊनलोड download केला जाऊ शकतो.
दरम्यान, अजय देवगणचा Ajay Devgan भुज - द प्राइड ऑफ इंडिया Bhuj-The Pride Of India हा चित्रपट एक पीरियड वॉर फिल्म आहे. ज्याची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावरुन काढली गेली आहे.
भुज च्या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या सर्व प्रमुख पात्रांची झलक दिसून आली होती. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भुज 13 ऑगस्ट रोजी डिझनी प्लस हॉटस्टार व्हीआयपी Disney Plus Hotstar VIP वर रिलीज झाला आहे. मुख्य भूमिकेत असलेला अजय देवगनचा हा पहिला चित्रपट आहे, जो थेट ओटीटी OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
भुज - या ऐतिहासिक युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत असताना प्राइड ऑफ इंडिया याच निमित्ताने येत आला आहे. अजय भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची Vijay Karnik भूमिका साकारत आहे. जो त्यावेळी भुज विमानतळाचा प्रभारी होता. 1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले. पाकिस्तानने 14 दिवसात 35 वेळा 92 बॉम्ब आणि 22 रॉकेट्सने भुज एअरफील्डवर हल्ला केला होता.
Edited By- Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.