
Ram Sampath Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता जे राम संपत याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी आयुष्याला कंटाळत त्याने हा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ एप्रिल रोजी अभिनेत्याने नेलमंगला येथील राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले.
संपत यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. संपतने मुख्यतः कन्नड टीव्ही इंडस्ट्रीत काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, जे राम संपतला चित्रपटात काम न मिळाल्याने अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळे मानसिक तणावाखाली त्याने आत्महत्येचे कठोर पाऊल उचलले. सोबतच आर्थिक अडचणींचा ही सामना करावा लागत असल्याने त्याने जीवन संपवले. (Tollywood)
या प्रकरणावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसून त्याचे पार्थिव नेलमंगला येथील खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी अभिनेत्याचे पार्थिव मुळगाव एनआर पुरा येथे नेण्यात येणार आहे. तथापि, अद्याप त्याच्या कुटुंबीयांकडून किंवा मित्रांकडून याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही. (Entertainment News)
'अग्निसाक्षी'सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये त्याने काम केले होते. सोबतच 'श्री बालाजी फोटो स्टुडिओ' या चित्रपटातही त्याने काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनीही कौतुक केले होते. चित्रपट दिग्दर्शक राजेश ध्रुव यांनी सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट लिहीत अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. अभिनेत्याच्या चाहत्यांनाही या बातमीने धक्का बसला आहे. (Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.