Tejaswini Pandit On Adipurush: आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर तेजस्विनी पंडितचा खुलासा ; शेअर केली मोठी Update

Tejaswini Pandit Share Post: तेजस्विनीने पोस्ट आदिपुरुषविषयी जाहीरपणे सांगितले आहे.
Tejaswini Pandit In Adipurush
Tejaswini Pandit In AdipurushInstagram @tejaswini_pandit
Published On

Tejaswini Pandit On Her Role In Adipurush : आदिपुरुष चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपट पाहायला गेल्या मराठी प्रेक्षकांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण या चित्रपटामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित झळकली आहे. तेजस्विनीने या चित्रपटाविषयी सांगितले होते पण भूमिकेविषयी ती काहीच बोलली नव्हती.

नुकतीच तेजस्विनीने पोस्ट करत याविषयी जाहीरपणे सांगितले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. चला पाहूया तेजस्विनीने काय पोस्ट केली आहे ते.

Tejaswini Pandit In Adipurush
Adipurush Controversy In Nepal : प्रदर्शनाच्या काही तासापूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटामध्ये केला मोठा बदल

तेजस्विनी पंडितने काय पोस्ट केले आहे ?

तेजस्विनीने तिच्या शूर्पणखेचे लूकमधील फोटो शेअर केला आहे. लांब मोकळे केस, गळ्यात माळा, मोरपिशी रंगाची साडी आणि सिंपल मेकअप असा फोटो तेजस्विनीने शेअर केला आहे.

तर तेजस्विनीने तिच्या या फोटोला कॅप्शन दिले आहे की, 'जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं.... म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये

आदिपुरुष चित्रपटामध्ये मला "शूर्पणखा" या भूमिकेत पाहा.'

तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत. स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, राधा कुलकर्णी, नम्रता संभेराव, सुखदा खांडकेकर सह अनेक कलाकारंनी कमेंट केल्या आहेत.

आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटासंबंधित वेगवेगळ्या बातम्या समोर यते आहेत. मा चित्रपटामध्ये प्रदर्शनाआधी केले बदल असो, चित्रपटाला पाहायला गेलेला मर्कट असो किंवा हनुमानाच्या आरक्षित खुर्चीत केलेली पूजा असो.

आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाने त्याची ८० % कमाई त्याचे म्युजिक आणि डिजिटल राईट विकून केली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कमाईला सुरूवात केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com