सिनेसृष्टीतील कलाकार कास्टिंग काउचचा सामना करत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. काही कलाकारांनी समोर येऊन आपल्याला आलेला कास्टिंग काउचचा (Casting Couch) अनुभव उघडपणे सर्वांसमोर सांगितला. आता एक-एक अभिनेत्री पुढे येऊन या कास्टिंग काउचचा पर्दाफाश करताना दिसत आहे. अशातच आणखी एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा अनुभव तब्बल २९ वर्षांनंतर सांगितला आहे.
ही दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर आहे. ईशाने बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही काम केले आहे. ईशाने वयाच्या १८ व्या वर्षी तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता, असं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हा गौप्य स्फोट केलेला आहे.
मुलाखतीमध्ये ईशाने सांगितलं की, "तुम्ही #MeToo बद्दल ऐकलंय का ? माझ्या काळात अनेक अभिनेत्रींनी #MeToo मुळे इंडस्ट्री सोडली. अनेकांनी हार मानली तर काही अभिनेत्र आजही इंडस्ट्रीत टिकून आहेत. त्या पैकीच मी एक आहे."
ईशा कोप्पीकरने पुढे मुलाखतीमध्ये सांगितलं, "वयाच्या १८ व्या वर्षी मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. कास्टिंग काउचसाठी सेक्रेटरीमार्फत एका बड्या अभिनेत्याने माझ्याशी संपर्क साधला. मी 18 वर्षांची होते. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले, त्यावेळी १८ वर्षांची होते. एका अभिनेत्याच्या मॅनेजरने मला काम मिळवण्यासाठी कलाकारांशी फ्रेंडशिप करावी लागेल, असं सांगितलं होतं. "
अभिनेत्रीने पुढे मुलाखतीमध्ये सांगितलं की, "इतकंच नाही तर, मला बॉलिवूडमधील एका ए लिस्ट अभिनेत्याने एकटं भेटायला बोलवलं होतं, तेव्हा मी २३ वर्षांची होते. त्या अभिनेत्याने मला आणण्यासाठी त्याच्या ड्रायव्हरला पाठवले होते. याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. अशी सक्त ताकीदही मला दिलेली होती. कारण त्यावेळी त्या ए लिस्ट अभिनेत्याचं इतर अभिनेत्रींसोबतही संबंध असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. मी त्याला एकटी येणार नाही, असं म्हणून नकार दिला होता. " बॉलिवूडमधल्या ए लिस्ट अभिनेत्याचं ईशा कोप्पीकरने नाव सांगितलेलं नाही. नेमका हा अभिनेता कोण ? अशी चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत आहे.
बॉलिवूडमधल्या बड्या अभिनेत्यांचे आणि दिग्दर्शकांचे मॅनेजरही अभिनेत्रींकडे चुकीच्या पद्धतीनं बघायचे. इतकंच नाही तर नको त्या पद्धतीनं स्पर्श करायचे, मुद्दाम हात घट्ट पकडायचे, दाबायचे... असंही तिने मुलाखतीमध्ये सांगितले. तामिळ चित्रपट ‘आयलान’मध्ये ईशा कोप्पीकर शेवटची दिसली होती. त्यासोबतच ती ‘फिजा’, ‘प्यार, इश्क और मोहब्बत’, ‘हॅलो डार्लिंग’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटांमध्येही दिसली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.