Athiya Shetty : टीम इंडियाच्या विजयानंतर अथिया शेट्टीची केएल राहुलसाठी खास पोस्ट, बेबी बंप फ्लॉन्ट करत...

Athiya Shetty Flaunting Baby Bump : 'चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५' टीम इंडियाच्या विजयानंतर अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडिया ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
Athiya Shetty Flaunting Baby Bump
Athiya ShettySAAM TV
Published On

'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025' मध्ये (ICC Champions Trophy 2025 ) टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. हा सामना इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा काल (9 मार्च) खेळला गेला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 251 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत भारतीय संघाने 254 धावा करून अखेर विजय मिळवला. टीम इंडियाच्या घवघवीत यशानंतर भारतभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही टीम इंडियाचे अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty) केएल राहुलसाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर अथिया शेट्टीनेला आपला आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल (KL Rahul) आता लवकरच आई-बाबा होणार आहेत. नवऱ्याला शुभेच्छा देणारी आणि आपले प्रेम व्यक्त करणारी स्टोरी अथियाने इंस्टाग्रामवर टाकली आहे. अथियाने इंस्टाग्रामवर स्टोरीला एक खास फोटो शेअर केला आहे.

अथियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. टीव्हीसमोर उभे राहून बेबी बंप फ्लॉन्ट करताना तिने फोटो क्लिक केला आहे. टीव्हीवर केएल राहुलचा फोटो दिसत आहे. असा फोटो अथियाने शेअर केला आहे. स्टोरीवर केएल राहुलला टॅग करून अथियाने हॉर्ट इमोजी शेअर केला आहे.

athiya shetty
athiya shettyinstagram

अथियाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एका खास पद्धतीने अथियाने नवऱ्याचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री अथिया शेट्टीने 2023 मध्ये क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली. आता 2025मध्ये ही दोघे आई-बाबा होणार आहे. अथिया आणि केएल राहुलचा मोठा चाहता वर्ग आहे.

Athiya Shetty Flaunting Baby Bump
khatron ke Khiladi 15 : 'खतरों के खिलाडी १५' मध्ये ग्लॅमरचा तडका, इमरान हाश्मीची हिरोईन झळकणार शोमध्ये?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com